Glass Shards Found In Pizza : पिझ्झा हे अनेकांचे आवडते जंक फूड आहे. खवय्ये मंडळी पिझ्झा खाण्यासाठी एका पायावर तयार असतात. ऑफिसमधील एखादा कार्यक्रम, मित्रांसोबतची पार्टी किंवा एखादे गेटटुगेदर पिझ्झा हा सगळीकडे असतोच. आरामात बसून स्वादिष्ट पिझ्झाचा आस्वाद घेताना जर कधी तुम्हाला त्यात काचेचा तुकडा दिसला तर? अर्थात तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील एका व्यक्तीसोबत घडला आहे ज्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटर युजर एके (@kolluri _arun) या व्यक्तीने डॉमिनॉजचा पिझ्झा झोमॅटोवरून ऑर्डर केला होता. या पिझ्झ्यामध्ये त्याला काही काचेचे तुकडे आढळले. याचे फोटो ट्विटरवर शेअर त्याने या निष्काळजीपणावर चिडून, ‘यामुळे ग्लोबल ब्रँडबाबत काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत, कदाचित पुन्हा कधीच डॉमिनॉजचा पिझ्झा ऑर्डर करणार नाही’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : लॉकडाउनमध्ये केलेल्या मदतीची त्याने ठेवली जाण; अनोख्या मैत्रीचा Viral Video एकदा पाहाच

ट्वीट :

या ट्वीटवर मुंबई पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली पाहा.

एका व्यक्तीने या ट्वीटवर झोमॅटोकडून डिलीवरी करताना काही चुक झाली असेल का याबाबत शंका व्यक्त केली. यावर झोमॅटोने काय प्रतिक्रिया दिली पाहा.

या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचा अनुभव शेअर केला आहे.

आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : एन्ट्री असावी तर अशी! नवी कार घरी आणल्याचा हा व्हिडीओ Viral का होतोय एकदा पाहाच

मनीकंट्रोल या बिझनेस न्यूज पोर्टलशी बोलताना डॉमिनॉजच्या प्रतिनिधींनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सोशल मीडियावरुन जेव्हा आम्हाला ही घटना समजली, तेव्हा आम्ही तात्काळ या ग्राहकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आमच्या क्वालिटी टीमकडुन रेस्टॉरंटची चाचणीदेखील करण्यात आली. या इन्स्पेक्शनमध्ये काहीही चुकीचे आढळले नाही. आमच्या किचनमध्ये ‘नो ग्लास पॉलिसी’चे पालन केले जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra man finds glass sharads in dominos pizza see companys response to it mumbai police zomato replied to twit pns
Show comments