Chiplun video viral : राग येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. आपल्याला दिवसभरातून अनेक वेळा अनेक गोष्टींचा राग येत असतो. मात्र, याच रागात काही चुकीचे निर्णय घेतले जातात आणि याच रागामुळे माणसाचा सर्वनाशही होऊ शकतो. रागावर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक असते. कधी कधी विचार न करता, घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला भाग पाडतो. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे; ज्यामध्ये पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने तरुणाने थेट हॉटेलमध्ये कार घुसवली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

एका क्षणाचा राग सगळं उद्ध्वस्त करतो

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक चिपळूणमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे; जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. मात्र, हा अपघात मुद्दाम रागाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे घडला आहे.

पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने तरुणाने काय केलं पाहा

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे. पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने एका कारचालकाने थेट हॉटेलमध्ये कार घुसवण्याचा प्रयत्न केलाय. चिपळूणमधील ओमी किचन हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पाण्याची बाटली द्यायला उशीर केल्याने वाहनचालकाची नाराजी या टोकापर्यंत पोहोचली. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पांढऱ्या रंगाची भरधाव कार हॉटेलमध्ये घुसवली आहे. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचेही झाल्याचे दिसत आहे. सुदैवाने हॉटेलमधील सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना कोणतीही हानी यामध्ये पोहोचलेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: रील्सच्या नादात काय काय करतात! धावत्या लोकलच्या दरवाजात तरुणीचा डान्स; थोडीशी चूक अन् खेळ खल्लास

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात.त्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत असून, तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्येच एक भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये रिक्षा आणि दुचाकी यांच्यात हा भयानक अपघात झालेला. दोन दुचाकीस्वारांनी मागून भरधाव येऊन रिक्षाला धडक दिली होती.