Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी कविता म्हणताना दिसतेय. कवितेद्वारे ती महिलांवरील अत्याचाराची व्यथा सांगताना दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढत त्यांच्या सारखा शासक हवा असल्याची इच्छा व्यक्त करते. सध्या या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj a young express grief through poem video goes viral on social media)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल.
तरुणी म्हणते,
“उपभोग तर घेतातच
नंतर जीवानीशी मारतात
शिक्षा व्हायचं लांब
फक्त कॅन्डल मार्च चालतात
अत्याचार होतो दहा मिनिटात
नंतर १० वर्ष न्यायाची वाट पाहावी लागतं
न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर
पुन्हा तेच तेच सांगावं लागतं
शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही
त्यातून तर धडा आम्ही काही घेतलाच नाही
शिवशाहीचा विचार चांगला
पण लोकशाहीला पेललाच नाही
वाईट वाटतं महाराज
आहो पण
पण नुसतच वाईट वाटत
पेपरमधल्या बातम्या वाचून
फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटतं
महाराज आज पुन्हा तुमचा अवतार
आम्हा बायकांना हवा आहे
तिथल्या तिथ फैसला देईल
असा शासक आम्हाला हवा आहे
असा शासक आम्हाला हवा आहे…”
तरुणीची ही कविता ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
rajdhani_satara03 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाराज आज तुमची गरज आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शिवाजी महाराजांची तलवार कधी महाराष्ट्रात येणार” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई आपले शिवबा राजे असते तर ही वेळ नसती आली” एक युजर लिहितो, “अगदी बरोबर आहे ताई इथे सुरक्षित नाही” तर एक युजर लिहितो, “तुम्ही बाईमाणूस जिजाऊमासाहेब व्हा,म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, लोकशाही पेक्षा शिवशाहीच खूप सुखी होती.. धन्य धन्य माझा राजा शिवशंभुराजा ..” अनेक युजर्सनी सहमती दर्शवली असून शिवशाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले आहेत.