Eknath Shinde: सध्या राज्यातील सत्तासंघर्षाचे केंद्र सध्या गुवाहाटी बनलेलं असताना या सत्ताकारणाच्या वातावरणात एक ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होतेय. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ही ऑडिओ क्लिप असून यातील त्यांचे संवाद सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आलेत. त्यांच्या ऑडिओ क्लिपमधले हे संवाद सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आलेत. यावर नेटीझन्सने अनेक मीम्स बनवले आहेत. याखेरीज यावर गाणी सुद्धा बनवली जात आहेत. नुकतच शंतनू पोळ या युट्युबरने एक गाणं बनवलं होतं. आता अजून एका कलाकाराने गाणं बनवलं आहे जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार हे गुवाहाटीत गेल्या काही दिवसांपासून थांबले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे ग्रामीण भागातील मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने शहाजी बापू पाटील यांना कॉल केला होता. त्यावेळी कार्यकर्त्यासोबत झालेला त्यांचा संवादातील एक ओळ फारच मजेदार आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्या नेहमीच्या गावरान स्टाईलमध्ये बोलताना दिसून आले. “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ या ओळींनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यावरूनच म्युझिक नावाच्या एका युट्युब चॅनेलवरून भन्नाट गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
(हे ही वाचा: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ ट्रेंडींग ओळींवर ‘या’ पठ्ठ्याने बनवलं गाणं; Video Viral)
पाहा व्हायरल व्हिडीओ :
शहाजी बापू पाटील यांचा व्हिडीओ पाहा –
(हे ही वाचा: Eknath Shinde: ‘शोधू कुठे, शोधू कुठे…” एकनाथ शिंदेंच्या प्रकरणावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
अवघ्या ३.१३ मिनिटाच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी हे गाण शेअर केलं जात आहे. अनेकांनी या गाण्यावर कमेंट्सही केल्या आहेत. जबरदस्त, खूप छान अश्या अनेक प्रकारच्या कमेंट्स युजर्स करत आहेत.