Pratapgad Sunrise Video: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा.. महाराष्ट्राचे अगदी तंतोतत वर्णन केलेली गोविंदाग्रजांची ही कविता प्रत्यक्षातही खरी उतरत असते. छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा ”किल्ले प्रतापगड” सातारा जिल्ह्यातील प्रतापगड या किल्ल्याचा एक सुंदर व्हिडिओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होतोय. शिवरायांच्या किल्ल्याना भेट देण्यासाठी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील नागरिकही मोठ्या संख्येने भेट देतात.
सातारा -प्रतापगड किल्याचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. अगदी दोनच दिवसांआधी याच किल्यावर शिवप्रतापदिन साजरा सुद्धा झाला होता. शिवप्रताप दिनानंतरच्या सकाळी प्रतापगडाचं विहंगम दृष्य पाहायला मिळालं. अनेक पर्याटकांनी त्यांच्या कॅमेऱ्यात हे विलोभनीय दृश्य कैद केले आहे.
प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> भाऊ-बहिणीची ‘हिच’ खरी माया; बहिणीच्या पाठवणीवेळी ढसाढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
प्रतापगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजाने १९६५ मध्ये बांधला होता. प्रतापगड किल्ल्यात ६० वर्षांपूर्वी स्थापित केलेला महाराजांचा पुतळा देखील आहे. गडामध्ये असलेले आकर्षक तलाव, मोठे खोल्या आणि लांब गडद कॉरिडॉर पर्यटकांना आकर्षित करते. अशी जागा आहे जिथे इतिहास प्रेमी, पर्यटक आणि निसर्गप्रेमी सर्व प्रकारच्या लोकांना हे स्थळ खूप आवडते. जर तुम्हाला निसर्गाच्या मांडीवर एखादा विस्मयकारक वेळ घालवायचा असेल तर एकदा या किल्ल्यावर एकदा भेट द्यायला नक्की जायला पाहिजे