Chandrapur Shocking video: कधी कधी विचार न करता घाईघाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चात्ताप करायला भाग पाडतो. काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो. याच उत्साहाला उधाण आलं की, तो उत्साह कधी अनाठायी धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही. कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात. पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाण्यापर्यंतचीही अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो. दररोज जे काही अपघात होतात, त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकारण काहीतरी अतिधाडस केल्याने घडतात. आता हेच बघा ना या कारचालकाचेही असेच; ज्यामध्ये एक कारचालकाने पुराच्या प्रवाहात चक्क आपली कार चालविण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न त्याच्या अंगलट आलाय.
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक अपघातही समोर येत आहेत. नदी-नाल्यांमध्ये वाहने वाहून गेल्याच्या बहुतांश घटना समोर येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी चंद्रपूर शहरात पावसाने संततधारेने हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर सुरू असताना लाल पेठ परिसरातील एका नाल्यातून कार वाहून गेली. दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणारी झारपाट नदी दुथडी भरून वाहत आहे. वेकोली महाकाली कालरीला जोडणाऱ्या स्मशानभूमीजवळील झारपाट नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. यावेळी एका कारचालकाने वाहत्या पाण्यातून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाडी प्रवाहाबरोबर वाहू लागली.
चंद्रपुरात नक्की काय घडलं?
या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, कार वाहून जात असून कारमध्ये बसलेल्या लोकांनी कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. एक व्यक्ती कारमधून उडी मारण्यात यशस्वी होते; तर दुसरा कारबरोबर वाहून जाताना दिसत आहे. वाहनातून प्रवास करणाऱ्या दोघांनीही सावधपणे उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र कार पाण्याच्या प्रवाहात वाहत राहिली. घटनास्थळी उपस्थित लोकांकडून सांगण्यात येत आहे की, कारमध्ये दोन जण होते. त्यापैकी एक जण धोका पाहून खाली उतरला आणि दुसऱ्याने झाडाला लटकून आपला जीव वाचवला. त्यामध्ये कार पाण्यातून कशी वाहत जात आहे हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, पाऊस सतत सुरू असल्याने ग्रामीण भागातही अनेक ठिकाणचे रस्ते बंद झालेले आहेत. नदी-नाल्यांना पूर आलेला असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत. अशा वेळी दुचाकी, चारचाकी वाहनचालकांनी पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “लोको पायलटवरच ही वेळ तर सामान्य प्रवाशांचं काय?” छत्री धरून ट्रेन चालवतानाचा Video पाहून बसेल धक्का
“घाईत घेतलेला निर्णय पश्चाताप करायलाही वेळ देत नाही”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर punepulse नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरीही संताप व्यक्त करीत प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटलेय, “घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चात्ताप करायलाही वेळ देत नाही.” दुसरा म्हणतो, “यांच्या या मूर्खपणामुळे ते आपला जीवही धोक्यात घालतात.”
धाडस, शौर्य व मूर्खपणा यांच्यामध्ये मोठा फरक आहे; पण हे अनेक लोकांना कळत नाही. त्यांचा मूर्खपणा, अतिशहाणपणा त्यांना कधी कुठे व कसा नडेल हे त्यांचे त्यांनाच कळत नसते. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा असाच मूर्खपणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.