Gau Nako Kisna Singer Video: शाहीर साबळे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नातू केदार शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. २८ एप्रिलला प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचे दुसरे गाणे म्हणजेच ‘गाऊ नको किसना’ हे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याला गुरु ठाकूर यांचे बोल व अजय अतुल यांचे संगीत असल्याने अर्थातच हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण त्याहीपेक्षा या गाण्याची खासियत ठरतोय हे गाणं गाणारा गायक.
तुम्हाला आठवतंय का चंद्रमुखी सिनेमाच्या वेळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक चिमुकल्याने गायलेलं चंद्रमुखी व्हर्जन प्रचंड गाजलं होतं. अजय अतुल यांनी गाऊ नको किसना हे गाणं गाण्यासाठी आता त्याच चिमुकल्याला म्हणजेच जयेश खरे याला संधी दिली आहे. ‘आईचा धाक आणि गाण्याची हाक, भजन-कीर्तन, भारुडं, ओव्यांमध्ये रमणाऱ्या लहानग्या किसनाचं, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील नवं गाणं ‘गाऊ नको किसना’..’ असं कॅप्शन देत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
प्रदर्शित झाल्यानंतर काही तासात हे गाणे व्हायरल झाले आहे. आतापर्यंत या गाण्याला ५ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत व सर्वांनीच जयेशच्या दमदार आवाजाचे कौतुक केले आहे. सामान्य घरातून आलेल्या शाहिरांच्या बालपणाचं रूप गाण्यातून मांडताना जयेश सारख्या स्थानिक कलाकाराला संधी देणे हे प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे.
जयेश खरेचं गाणं: गाऊ नको किसना (Video)
हे ही वाचा<< भारती सिंहने खाण्यावर प्रचंड प्रेम असताना १५ किलो वजन कमी कसं केलं? फॅन्सना सांगितले ‘हे’ ४ सिक्रेट फंडे
जयेश खरे “मी होणार सुपर स्टार,छोटे उस्ताद ” या कार्यक्रमात आपल्या आवाजाचा जलवा दाखवत १८ व्या फेरी पर्यत पोहचला होता. गायक आदर्श शिंदे,सचिन पिळगांवकर,गायीका वैशाली सामंत यांची वाहवा मिळविली होती. जयेशचे वडिल विश्वास खरे हे मजुरी करून एका खाजगी ऑक्रेस्टामध्ये गायनाचे काम करतात.