Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Fact Check : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच आता ईव्हीएम मशीनच्या छेडछाडीबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशात ईव्हीएम मशीनसंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला आढळून आले. त्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) चोरताना पकडले गेले, असा दावा करण्यात आला आहे; पण खरंच अशी कोणती घटना घडली का? यामागचे तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं; ते काय जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर नव्या वर्माने तिच्या प्रोफाईलवर दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील अगदी तशाच दाव्यांसह तोच व्हिडीओ पोस्ट करत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओमधील स्क्रीनशॉट्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आमचा तपास सुरू केला.

आम्ही प्रथम कार क्रमांक MH 19 BU 6027 पाहिला आणि तसास केला तेव्हा वाहनाची नोंदणी महाराष्ट्रातील जळगाव येथील असल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च आणि कीवर्ड सर्च केला, ज्यामुळे आम्हाला NDTV इंडियाच्या X हॅण्डलवर एक व्हिडीओ मिळाला. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अगदी सारखाच कार क्रमांक होता, जो व्हायरल व्हिडीओमधील कारचा आहे.

कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, नागपुरात काही लोकांनी विभागीय अधिकाऱ्याच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे त्या अधिकाऱ्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या कारमध्ये एक ईव्हीएम मशीन होती आणि लोकांचा गैरसमज झाला की, हे तेच ईव्हीएम आहे, जे निवडणुकीच्या मतदानासाठी वापरले होते; पण त्यांच्या कारमध्ये ठेवलेली ती एक अतिरिक्त ईव्हीएम मशीन होती.

VIDEO : मराठी माणसाची गळचेपी थांबणार तरी कधी? मराठी बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने नाकारले तिकीट; तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?

आम्हाला ABPLIVE YouTube चॅनेलवर एक व्हिडीओदेखील सापडला.

त्ययाच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की : मतदान संपल्यानंतर महाराष्ट्रात हिंसाचार झाला. नागपूरच्या किल्ला परिसरात झोनल ऑफिसरवर अज्ञातांकडून हल्ला

आम्ही एक कीवर्ड सर्चदेखील चालवला यावेळी आम्हाला घटनेबद्दल काही बातम्या आढळल्या.

https://www.indiatvnews.com/maharashtra/maharashtra-elections-2024-nagpur-evm-attack-kotwali-police-station-polling-station-bjp-vs-congress-2024-11-20-962616
https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/clash-erups-in-nagpur-as-congress-and-bjp-workers-attack-evm-transport/articleshow/115501328.cms

या बातम्यांमध्ये म्हटले होते की : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला केल्याने तणाव निर्माण झाला. ईव्हीएम हे स्टॅण्डबाय युनिट असून, ते मतदानासाठी वापरले जात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.

निष्कर्ष :

काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिरिक्त ईव्हीएम मशीन वाहून नेणाऱ्या वाहनावर हल्ला केला, तसेच कारच्या काचांची तोडफोड केली. पण, ती ईव्हीएम मतदानासाठी वापरण्यात आलीच नव्हती; तर ती एक अतिरिक्त ईव्हीएम मशीन होती. तपासादरम्यान आढळून आले की, ही नागपुरातील घटना आहे, जिथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदानानंतर ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या कारवर हल्ला केला. कारण- त्यांना असा समज झाला की, मशीन वाहून नेणारे लोक भाजपाचे कार्यकर्ते असून, ते मशीन चोरतायत. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.