Maharashtrachi Hasyajatra: छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त गाजणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. त्यांच्या स्किटमध्ये असलेले एक-एक विनोद हे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. नुकताच शोमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ शोमधल्या काही डायलॉग्सचं गाण्यात रुपांतर करण्यात आल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होणार नाही. तुम्हाला आठवत असेल याआधी या कार्यक्रमातील ‘अवली लवली कोहली’ गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. असाच आता आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ऐकल्यानंतर हसून हसून तुम्हीही वेडे व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री वनिता खरात सासूच्या भूमिकेत आहे. तर शिवाली, नम्रता आणि चेताना या तिघींनी सुनबाईची भूमिका साकारलीये. यावेळी या तिघी ‘आम्ही बाई सूना, आम्ही बाई सूना, सासूबाई लावी आमच्या संसाराला चुना’ अशा मजेशीर ओळी बोलत बोलत डान्स करत आहेत. तेवढ्यात वनिता खरात सासूच्या भूमिकेत आणि या तिघीही सुनांची बोबडी वळते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होणार नाही.
त्यांच्या या स्कीटवर केलेल्या धम्माल डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.खरंतर, हास्यजत्रेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली आहे. कुटुंबातील सदस्यांची भन्नाट नावं ऐकली तरी कोणाला हसू अनावर होत नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अरे आवरा हिला! लग्नाचा लेहंगा घालून नवरीची बाईकवर स्टंटबाजी; VIDEO एकदा पाहाच
या गाण्यावर त्यांनी केलेल्या डान्स स्टेप्स देखील फार मजेशीर आहेत. @Sonymarathi या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनीच हा ऍपिसोड पाहण्याची इच्छा व्यक्त केलीये. सोशल मीडियावर या व्हिडीओला लाखोंच्या घरात व्हूज मिळाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून लोटपोट हसाल.
या कार्यक्रमातील समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते.तर अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओक हे या शोचे परीक्षक आहेत.