Top Google Trends Maharashtra: आजचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. त्यावर रोज वेगवेगळे विषय हे ट्रेंडिंगवर असतात. एखादा विषय सहज येतो आणि अख्ख्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतो. तर, कधी एखाद्या घटनेमुळे त्याच्या आणखी चार बाजू सोशल मीडियामुळे समोर येतात. याच गूगल ट्रेंडवर गेल्या सात दिवसांमध्ये महाराष्ट्रातील नेमके कोणते विषय ट्रेंड झाले, लोकांनी कोणते विषय सर्वाधिक सर्च केले, कोणत्या विषयासंदर्भात युजर्सनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे आपण पाहू.

आपण पहिले पाच किवर्ड्स पाहू जे सर्वाधिक सर्च झालेले आहेत.

कोणते किवर्ड्स सर्च केले?

१. Rain
२. Flipkart
३. Flipkart website
४. Flipkart E- Commerce
५. Amazon

(सौजन्य – google trend)

१. Rain

गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रात ट्रेंड होणारा पहिला कीवर्ड पाऊस आहे. याचं कारण असं की, मुंबईसह महाराष्ट्रभरात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. कोल्हापूर, मुंबई, नागपूर, विदर्भात तसंच राज्यातील इतरही अनेक भागांत पाऊस झाला. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेतीचं नुकसानही झालं. तर मुंबईत आठवडाभरात मुसळधार पावसाने कहर केला. शहरात ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला होता. याच परतीच्या पावसामुळे गूगलवर रेन हा कीवर्ड ट्रेंड होत होता.

२. Flipkart

गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रात ट्रेंड होणारा दुसरा कीवर्ड फ्लिपकार्ट हा आहे. याचं कारण असं की, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल २०२४ आणि अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल २०२४ सेलला २७ तारखेपासून सुरुवात झाली आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना आयफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आपल्याला हव्या असलेल्या स्वतात स्वस्त वस्तू निवडून, त्या खरेदी करण्यासाठी ग्राहक गूगलवर ऑफर्सबाबत सर्च करीत होते. त्यामुळेच फ्लिपकार्ट कीवर्ड ट्रेंड होत होता.

३. Flipkart website

गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रात ट्रेंड होणारा तिसरा कीवर्ड म्हणजे फ्लिपकार्ट ही वेबसाईट आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आता सुरू झाल्यामुळे या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर विशेष सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक आता या सेलचा मनसोक्त लाभ घेत आहे आणि म्हणूनच ग्राहक फ्लिपकार्टची वेबसाईट सर्च करीत आहेत. त्यामुळेच फ्लिपकार्ट वेबसाईट हा कीवर्ड ट्रेंड होत होता.

४. Flipkart E- Commerce

गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रात ट्रेंड होणारा चौथा कीवर्ड हा फ्लिपकार्ट ई-कॉमर्स आहे. ऑनलाइन विक्रीमुळे लोकांची खरेदी करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी दुकानात जाऊन खरेदी करण्याला पहिली पसंती राहत असे. आता व्यवहारापासून ते खरेदीपर्यंत सर्व काही ऑनलाइन झाले आहे. मात्र आता ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाइन मार्केट प्लेसवर मिळणारी सवलत आणि विकत घेतलेल्या वस्तूंची रिटर्न पॉलिसी आहे. त्यात फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आता सुरू झाल्यामुळे ग्राहकांची सर्वाधिक पसंती फ्लिपकार्टला मिळाली. त्यामुळे फ्लिपकार्ट ई-कॉमर्स हा कीवर्ड गूगलला ट्रेंड होत होता.

५. Amazon

गेल्या सात दिवसांत महाराष्ट्रात ट्रेंड होणारा पाचवा कीवर्ड हा अॅमेझॉन आहे. ई-कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनने आपल्या वर्षातील सर्वांत मोठा सेल अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची सुरुवात केली आहे. या सेलअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बंपर डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपला मोर्चा अ‍ॅमेझॉनकडे वळवला.

हेही वाचा >> भारताच्या चिंतेत वाढ! केरळमध्ये आढळला मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण; गूगल ट्रेंड्समध्ये असणारे मंकी पॉक्स म्हणजे नक्की काय?

दरम्यान लोकांनी गुगलवर विशिष्ट विषयांसंदर्भात मोठ्या प्रमाणात सर्च केलेले विषयही आपण पाहुयात.

सर्वाधिक विचारलेल्या प्रश्नांमध्ये पहिला नंबरवर आयर्लंड vs साऊथ आफ्रिका. यूएईमध्ये दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. मात्र, आयर्लंडने दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यामुळे आयर्लंड vs साऊथ आफ्रिका हा प्रश्न सर्वाधिक सर्च केला आहे.

सर्वाधिक विचारलेल्या प्रश्नांमध्ये दुसऱ्या नंबरवर india women vs west indies women हा कीवर्ड आहे. ICC महिला T20 विश्वचषक २०२४ सराव सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजचा पराभव केला. त्यामुळे हा कीवर्ड सर्वाधिक सर्च केला गेला.