Types of Maharashtrian Nath : नथ हा महाराष्ट्राचा एक पारंपारिक दागिना असून या नथला महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रीयन साज श्रृंगार करताना नथीमुळे स्त्रियांचे सौंदर्य खुलते. पिवळे पांढरे धम्मक मोती त्यात लाल, हिरव्या आणि पांढऱ्या मोती गुंफलेले असतात. नऊवारीवर नथ घातली नाही तर श्रृंगार अपूर्ण वाटतो. त्यामुळे नऊवारीवर आवर्जून मराठमोळी नथ घातली जाते. याशिवाय कोणत्याही शुभ प्रसंगी, लग्न किंवा मंगलकार्यात स्त्रिया आवडीने नथ घालून मिरवतात. पण तुम्हाला या नथीचे प्रकार माहित आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या महाराष्ट्रीयन नथीचे प्रकार सांगितले आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये महाराष्ट्रीयन नथींचे प्रकार त्यांच्या फोटो व नावासह सांगितले आहे. या व्हिडीओमधील एक तरी नथ तुमच्याजवळ असेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित एखादी नथ विकत घ्यावीशी वाटेल. (Maharashtrian Nath Video do you know Types of Maharashtrian Nath video goes viral)
ही वाचा : गुजरातच्या चहावाल्याचं टॅलेंट एकदा पाहाच! चहापेक्षा कडक गातोय भाऊ; VIDEO होतोय व्हायरल
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे महाराष्ट्रीयन नथींचे सुंदर प्रकार – (Types of of Maharashtrian Nath)
१. कारवारी नथ
२. मारवाडी नथ
३. पुणेरी नथ
४. मोती नथ
५. महाराष्ट्रीयन नथ
६. पेशवाई नथ
७. बाजीराव मस्तानी नथ
८. मल्हारी कारवारी नथ
९. बानु नथ
पाहा व्हायरल व्हिडीओ
shwetnick98 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाराष्ट्रीयन पारंपारिक नथ”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय,”सर्ज्याची नथ म्हणजे काय असते..” तर एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्रीयण नथ” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी तर फिदा झाले ग बाईईईईई” एक युजर लिहितो, “किती सुंदर नथी आहे.” तर एक युजर लिहितो, “मी यातील काही नथी खरेदी करणार.” अनेक युजर्सना वरील नथी आवडल्या आहेत.
हल्ली तरुण मुली वेगवेगळ्या वेशभूषेवर नथ घालतात . साडी किंवा नऊवारीवर घालताच पण जीन्स कुर्ती असो किंवा सलवार सुटवर सुद्धा आवडीने नथ घालतात. व्हिडीओमध्ये जरी महाराष्ट्रीयन मूळ प्रकार दाखवले तरी या प्रकारामध्ये सुद्धा अनेक डिझाइन्स दिसून येतात.