Viral Video : असं म्हणतात, आपल्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारा जोडीदार भेटायला भाग्य लागतं. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला एक असा जोडीदार भेटावा जो आपल्याला समजून घेईल आणि आपल्याला आयुष्यभर साथ देईन. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. लग्नानंतर माणसाचे आयुष्य बदलते. दोन व्यक्ती एकत्र येतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडप्यामधील नि:स्वार्थ प्रेम दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. (Maharashtrian old couple emotional video aaji aajoba kept love bonding people are lucky get selfless love from partner forever)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोटरसायकल दिसेल. या मोटर सायकलवर आजी बसलेली आहे आणि आजोबा चक्क हातात मोटर सायकल घेऊन पायी चालत आहे. पुढे आजोबा एका ठिकाणी मोटरसायकल थांबवतात आणि आजी खाली उतरते. या आजी आजोबांचे वय ७०-७५ च्या वर असावेत. म्हातारपणात या दोघांचे एकमेकांवर असलेले असीम प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. प्रत्येकाला असा जोडीदार मिळावा असे तुम्हाला वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
somraj_bade_1415_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निःस्वार्थ प्रेम करणारा साथीदार भेटणं…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “याला म्हणायचं खर कट्टर प्रेम” तर एका युजरने लिहिलेय, “निःस्वार्थ प्रेम कायम सोबत असायला हवं” आणखी एका युजरने लिहिलेय, “हीच ती पिढी आहे निस्वार्थ प्रेम करणारी आणि ज्यांनी हा विचार कधीच नाही केला की माझी मुलं माझा सांभाळ करतील की नाही” एक युजर लिहितो, “आजच्या पिढीला इथपर्यंत जगता आल पाहिजे” तर एक युजर लिहितो, “ती साथ शेवट पर्यंत देवांनी टिकवली पाहिजे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.