तुम्ही कधी पाय दुखेपर्यंत एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या लग्नात नाचला आहात का? तुम्हाला नाचायला कितीही आवडत असलं तरी अशावेळी जाणवणाऱ्या वेदना आपल्याला असह्य असतात. आता एवढं नाचल्यानंतर आपण आपल्या पायांवर उभे देखील राहू शकणार नाही. पण महाराष्ट्राच्या सृष्टीने मात्र अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. अवघ्या १६ वर्षाच्या सृष्टीने ५-६ तास नव्हे तर सलग १२७ तास नृत्य करून नवा विश्वविक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूरच्या सृष्टीने १२७ तासांचा नृत्य रचला विश्वविक्रम

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, लातूरच्या सृष्टी जगताप हिने १२७ तासांचा नृत्य करून longest dance marathonचा वैयक्तिक विक्रम मोडला आहे. २९ मे रोजी सकाळी तिच्या कॉलेजच्या सभागृहात तिने हा नृत्य सुरू केले आणि ३ जूनच्या दुपारपर्यंत नृत्य करुन तिने हा नवीन विश्वविक्रम केला. १२६ तासांचा विक्रम मोडल्यानंतर सृष्टी संपूर्ण दिवस झोपून होती.

सृष्टीसाठी शेवटचा दिवस सर्वात कठीण होता

सृष्टीने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, शेवटचा दिवस तिच्या शरीरासाठी सर्वात कठीण होता. “माझ्या शरीराचे सर्व अवयव आखडले होते आणि मला वेदना जाणवत होती. पण मानसिकदृष्ट्या मी माझ्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले होते. सतत केलेल्या चांगल्या सरावामुळे, मी माझ्या मनातील आणि शरीरातील सर्व बदलांशी परिचित होते, त्यामुळे मी शेवटपर्यंत शांत आणि स्थिर होते,” असे तिने सांगितले.

हेही वाचा – एआयने तयार केला आनंद महिंद्रांचा फोटो, स्वत:ला पाहून म्हणाले, ‘आपलं भविष्य…’

आई-वडिलांनी दिली सृष्टीला साथ

काही क्षण असे होते जेव्हा ती खूप थकली होती. पण तिचे आईवडील सतत त्यांच्या पाठीशी होते आणि तिला ताजेतवाने ठेवण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर पाण्याचा फवारा मारत होते. ‘एकंदरीत अतिशय प्रभावी कामगिरी.” असे डांगरीकर यांनी अधिकृत वेबसाइटला सांगितले. सृष्टीने भारतीय शास्त्रीय नृत्याच्या आठ प्रमुख प्रकारांपैकी एक कथ्थक सादर केले कारण तिला ‘भारतीय संस्कृतीचा प्रचार करायचा होता आणि नृत्याद्वारे भारताचे प्रतिनिधित्व करायचे होते.”

अशी केली सृष्टीने तयारी

सृष्टी १२६ तासांच्या डान्स मॅरेथॉनसाठी रोज घरीच जोरदार करत होती. गाढ झोपेच्या वेळीच शरीराची झीज भरून काढली जाते आणि उर्जा पुन्हा निर्माण केली जाते त्यामुळे झोपेवर नियंत्र मिळविणअयासाठी तिने तिचे आजोबा बबन माने यांच्याकडे योग निद्रेचे प्रशिक्षणही घेतले. योग निद्रेचा सराव केल्याने डेल्टा ब्रेनवेव्ह अॅक्टिव्ह होऊ शकतात, ज्यामुळे ‘झोपेवर नियंत्रण”करणे शक्य होते.

हेही वाचा – गर्भवती महिलेला जागा देण्यास पुरुषाने दिला नकार! खुर्चीवरुन पेटला नवा वाद, तुम्हीच सांगा चूक कोणाची?

तिच्या दैनंदिन दिनचर्येत चार तासांचा ध्यान, सहा तासांचा नृत्याचा सराव आणि तीन तास इतर व्यायामाचा समावेश होता, ज्यामध्ये रात्री १० ते पहाटे ३ पर्यंत एकूण फक्त पाच तास झोपत असे. ती सर्व यशाचे श्रेय तिच्या पालकांना देते, ज्यांच्या पाठिंब्याशिवाय ती शेवटपर्यंत पोहोचली नसती.

याआधी नेपाळी नृत्यांगना बंदनाने केला होता १२६ तासांचा विक्रम

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने असा निर्णय दिला आहे की, मान्यताप्राप्त नृत्यशैली ठरलेल्या मानकांनुसार सादर केली जावी. कोणत्याही वेळी सहभागीचे पाय संगीतावर थिरकणे जाणे थांबवू शकत नाहीत. यापूर्वी हा विक्रम नेपाळी नृत्यांगना बंदना नेपाळ हिने २०१८ मध्ये १२६ तास नृत्य केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrian teen shrushi jagtap form latur sets guinness world record with nonstop 127 hour dance marathon snk
Show comments