जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबांनी हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतेच त्यांच्या मुलाचा साखरपुडा झाला त्यानिमित्ताने संपुर्ण सोशल मीडिया अंबांनीमय झाला होता. अंबानी कुटुंब जसं उद्योग विश्वातील नवनवीन अविष्कारांसाठी फेमस आहे तसेच ते दानधर्म आणि धार्मिक गोष्टींसाठीही फेमस आहे. कारण अंबानी कुटुंब धार्मिक असल्याचं अनेकदा त्यांच्या अनेक कृतीवरुन सिद्ध होतं.

कारण ते सतत अनेक देवस्थानांना भेट देतात, देवदर्शन करतात आणि मंदिरांना देणग्याही देत असतात याबाबच्या बातम्या आपण सतत पाहत असतो. अशातच आता महाशिवरात्रीनिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरात येथील सोमनाथ मंदिराला मुलगा आकाश अंबानीसह भेट दिली. यावेळी त्यांनी सोमनाथ महादेवाचा रुद्राभिषेकही केला आणि मंदिर ट्रस्टला १.५१ कोटी रुपयांची देणगीही दिली आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Minimum Support Price for Agricultural Produce
शेतमालाला हमीभाव नाहीच ; केंद्राच्या धडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?

हेही वाचा- पूर्वी एक किलो सोने ‘इतक्या’ रुपयांत; १९५९ सालचे व्हायरल होत असलेले बिल पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुकेश अंबानी आणि आकाश अंबानींचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पीके लाहिरी आणि सचिव योगेंद्र देसाई यांनी स्वागत केले. यावेळी मंदिर ट्रस्टतर्फे अंबानी पितापुत्रांचे शाल देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी भोलेनाथाचा रुद्राभिषेकही केल्याचे फोटो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून सर्वजण अंबानी कुटुंबाचे कौतुक करताना दिसत आहेत.

हेही पाहा- चहासोबत ब्रेड खायला तुम्हालाही आवडतं? तर ब्रेड बनवतानाचा ‘हा’ किळसवाणा Video एकदा पाहाच

देणगीची परंपरा जुनीच –

मागील ऑक्टोबरमध्ये आकाश अंबानी यांनी राजस्थानमधील राजसमंद येथील नाथद्वारा येथील प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात Jio 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. दिवाळीनिमित्त त्यांनी मंदिर ट्रस्टला दीड कोटी रुपयांची देणगीही दिली होती. तर मुकेश अंबानी यांनी सप्टेंबरमध्ये आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरासाठी दीड कोटींची देणगी दिली होती. त्यामुळे अंबानी कुटुंब हे धार्मिक असल्याचं त्यांच्या या कृतीवरुन सतत सिद्ध होत असतं.