Mahashivratri 2025 Live Updates: हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठया भक्ती भावाने पूजा करतात आणि उपवास करतात. अशातच आज महाकुंभ सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे. ४५ दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने झाली आहे. महाकुंभासाठी आलेल्या भाविकांपेक्षा केवळ भारत आणि चीनमध्येच जास्त लोकसंख्या आहे. जगातील हिंदूंच्या निम्म्या लोकसंख्येइतके लोक येथे आले आहेत, असा दावा योगी सरकारने केला आहे.
Mahashivratri 2025 Live Updates, 26 February 2025: हर हर महादेव! देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात सुरु
Maha Kumbh 2025: महाशिवरात्रीला अखेर महाकुंभमेळ्याची सांगता!
Mahakumbh 2025 : आज महाकुंभ सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे. ४५ दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने झाली आहे. या काळात तब्बल ६५ कोटी भाविकांनी इथं पवित्र स्नान केलं. महाकुंभासाठी आलेल्या भाविकांपेक्षा केवळ भारत आणि चीनमध्येच जास्त लोकसंख्या आहे. जगातील हिंदूंच्या निम्म्या लोकसंख्येइतके लोक येथे आले आहेत, असा दावा योगी सरकारने केला आहे.
https://twitter.com/anoupsrivastava/status/1894700266395492796
हर हर महादेवाच्या घोषात दुमदुमले मार्लेश्वर, लाखो भाविकांनी घेतले स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन
हर हर मार्लेश्वर, शिवहराच्या जयघोषाात महाशिवरात्री दिनी आज राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू मार्लेश्वर देवाचे हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. देवरूख शहरापासून सुमारे १८ किमी अंतरावर स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. हे देवस्थान भगवान शंकराचे असल्यामुळे मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करीत असतात. आज महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी मार्लेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने तीर्थक्षेत्री गर्दी केली होती. शिवभक्तांच्या जयघोषाने मार्लेश्वर मंदिराचा परिसर अक्षरश: दणाणून गेला.
प्रतापगड किल्ल्यावर शिवरात्री निमित्त हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन, एकाच ठिकाणी शिवलींग आणि खाव्जा उस्मान गणी हारूनी यांची दर्गा
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगडावर महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळत असून, प्रतापगड किल्यावर एका बाजूला भव्य दिव्य भगवान शंकराची मूर्ती आहे. तर दुसऱ्या बाजूला खाव्जा उस्मान गणी हारूनी यांची दर्गा असून, दोन्ही समाज बांधव महाशिवरात्रीनिमित्त या किल्यावर एकत्र येतात. संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून, सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर पाहायला मिळतो.
ठाण्यात रायतेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे भव्य आयोजन
ठाण्यातील रायतेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रायतेश्वर सेवा मंडळ, रघुनाथ नगर, ठाणे यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली महादेवाची पूजा
महाशिवरात्री निमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोरस नक्षत्र सोसायटी येथील शिव शंकराच्या मंदिरात कुटुंबासह महादेवाची पूजा केली.
https://twitter.com/PratapSarnaik/status/1894648200671150359
Mahashivratri 2025 live updates: बाबुलनाथ मंदिराबाहेर भाविकांच्या लांबलचक रांगा
महाशिवरात्री २०२५ निमित्त श्री बाबुलनाथ मंदिराबाहेर भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या असून गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Maha Shivratri 2025 : महाशिवरात्रीला पुण्यातील ‘या’ पाच महादेवाच्या मंदिरांना अवश्य भेट द्या
video : सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील महादेवाच्या सुंदर मंदिरांविषयी माहिती सांगितली आहे. या मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता.
महाशिवरात्रीच्या दिवशी निर्माण होतोय दुर्लभ संयोग, ‘या’ तीन राशींची होणार चांदी, नोकरी व्यवसायात मिळेल भरघोस यश अन् अपार श्रीमंती
Maha shivratri 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी महाशिवरात्री खूप खास मानली जात आहे. कारण मीन राशीमध्ये बुध, सूर्य आणि शनिची युती निर्माण होऊन त्रिग्रही , शश आणि बुधादित्य योग निर्माण होत आहे. तसेच मीन राशीमध्ये मालव्यय आणि शुक्र राहुची युती निर्माण होत आहे. तसेच सर्वार्थ सिद्धी आणि शिव योग निर्माण होत आहे. जाणून घेऊ या या सर्व राशींविषयी.
हिंदू पंचांगानुसार यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्दशीस महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी शिव व पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता, अशी पौराणिक मान्यता आहे. या दिवशी भक्त कडक उपवास करतात. एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करतात.
महाशिवरात्री २०२५ लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
Mahashivratri 2025 Live Updates, 26 February 2025: महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा उत्साह शिगेला, राज्यभरातील मंदिरात पहाटेपासून भक्तांची गर्दी