MVA Celebration Pakistani Flag Video: लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात भाजपाचा प्रभाव कमी झालाय हे सिद्ध झाले. काँग्रेससह महाविकासआघाडीने महाराष्ट्रात २९ जागी विजयी पताका रोवली आहे. भाजपाने जल्लोषाची पूर्ण तयारी केली असताना आनंद साजरा करण्याची खरी संधी मात्र ठाकरे-पवार – पटोले गटाला मिळाली. मविआच्या सेलिब्रेशनच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला काही पोस्ट्समध्ये पाकिस्तानी झेंड्यांचा संदर्भ दिल्याचे आढळून आले. निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्रात झालेल्या जल्लोषात मुस्लिम कार्यकत्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते असा दावा या व्हिडीओसह करण्यात आला आहे. तपासादरम्यान या झेंड्याच्या काही तपशीलांवरून आम्हाला खरी स्थिती लक्षात आली आहे. नेमकं असं काय घडलं हे पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Sudarshan Marathi ने व्हायरल व्हिडीओ दाव्या सह आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.
असाच आणखी एक व्हिडीओही याच दाव्याने शेअर केला जात आहे.
नाशिकमधील आणखी एक व्हिडीओ याच X वापरकर्त्याने याच दाव्यासह शेअर केला आहे.
तपास:
व्हिडीओमध्ये दिसणारा ध्वजाचा फोटो आम्ही गूगलवर शोधला. व्हिडीओमध्ये दिसणारा ध्वज हिरवा रंगाचा होता, त्यात चंद्रकोर आणि एक तारा होता जो इस्लामचे प्रतीक आहे. त्यानंतर आम्ही पाकिस्तानचा ध्वज तपासला. पाकिस्तानच्या ध्वजात गडद हिरव्यारंगा बरोबर पांढरा उभा पट्टा, पांढरा चंद्रकोर आणि मध्यभागी पाच टोकांचा तारा आहे.
व्हिडीओ, अहमदनगरमधील वेस्टन स्क्वेअरचा आहे, गूगल मॅपवर सुद्धा काही साधर्म्य आढळून आले होते.
नाशिकमधील असल्याचा दावा करत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लोक पाकिस्तानचा ध्वज नव्हे तर इस्लामिक ध्वज फडकावताना दिसले. तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही अहमदनगरमधील निलेश लंके फाऊंडेशनचे सचिव राहुल झावरे यांच्याशी संपर्क साधला ज्यांनी स्पष्ट केले की मविआचा विजय साजरा करणारे मुस्लिम कार्यकर्ते कोणत्याही संघटना किंवा कोणत्याही इस्लामिक राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत.
हे ही वाचा<< अमरावतीचा निकाल पाहून नवनीत राणा रडल्या? Video वर लोक म्हणतायत, “मशिदीकडे बघून बाण मारताना..”, खरा संबंध काय?
निष्कर्ष: महाराष्ट्राच्या विविध भागात MVA (महाविकास आघाडी) च्या सेलिब्रेशनदरम्यान पाकिस्तानचा ध्वज फडकवण्यात आला नाही, हा व्हायरल दावा खोटा आहे.