Mahavir Jayanti 2025 Wishes In Marathi: महावीर जयंती हा जैन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. जैन ग्रंथानुसार, जैन समाजातील शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षातील त्रयोदशीला झाला, त्यामुळे जैन धर्मीय लोक हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करतात. भगवान महावीरांच्या आईचे नाव त्रिशाला आणि वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. भगवान महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. वयाच्या ३० व्या वर्षापासून त्यांचा अध्यात्माकडे कल होता, त्यांनी राजवाडा सोडला आणि तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.

भगवान महावीर कोण होते?

भगवान महावीरांनी अहिंसा परमो धर्माचा संदेश जगभर पसरवला. त्यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. त्यांचा जन्म बिहारमध्ये इ.स.पूर्व ५९९ मध्ये लिच्छवी घराण्याचे महाराज सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्या पोटी झाला. महावीर यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी ज्ञानप्राप्तीसाठी राजवाड्यातील सुखांचा त्याग केला होता, त्यानंतर त्यांनी तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला होता. असे मानले जाते की १२ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना महावीर या नावाने ओळख मिळाली.या आनंदाच्या दिवसानिमित्ताने लोक एकमेकांना मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या शुभेच्छाही देतात. यामुळे तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या शुभेच्छाही देऊ शकता-

महावीर जयंती कोट्स, मेसेज (Mahavir Jayanti Quotes, Message in Marathi)

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

हिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

सत्या आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सर्व जैन बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा

संपूर्ण जगाला अहिंसा , दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आण जगू द्या
हा संदेश देणारे भगवान महावीर यांना आज जयंती निमित्त अभिवादन. सर्वांना मनापासून शुभेच्छा

अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश, शिक्षकांचा धडा, संतांची संगत, अहिंसेचा प्रचार…
महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा !

रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आत्मा एकटा येतो
आणि एकटा जातो,
ना त्याला कोणी आधार देत
ना कोणी मित्र बनतो.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

एकही युद्ध लढले नाही, तरीही युद्ध जिंकले, अहिंसेचा, अनेकांतचा, अनंताचा मंत्र दिला
त्या जगाचा तारा असलेल्या महावीरांना कोटी कोटी वंदन, आपणही त्यांच्या मार्गावर चालत भौतिक बंधने तोडू या.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

तुमच्या आत्म्यापलीकडे कोणीही शत्रू नाही.
खरे शत्रू तुमच्या आत राहतात.
ते शत्रू म्हणजे क्रोध, अभिमान, लोभ, आसक्ती आणि द्वेष.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

लाखो शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले आहे. महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.”
असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!!