MS DHONI VIRAL POST: भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचं नाव आपसूक समोर येतं. एम. एस धोनीची कारकी‍र्द अविश्वसनीय असल्याने खूपजण त्याचा आदर करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाखोंच्या संख्येने या क्रिकेटपटूचे चाहते आहेत. सोशल मीडियावर अनेदा ‘थाला’चे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होताना दिसतात, अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. पण ही पोस्ट शेअर करणारा धोनीचा चाहता नक्कीच नाही.

हेही वाचा… Viral Video: पायांना बांधले चक्क स्टूल अन्…, पावसाळ्यातील जुगाड पडला भारी; पाण्याखालील रस्त्यावर तोल गेल्याने…

एम. एस. धोनीने नुकतीच अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात उपस्थिती दर्शविली होती. धोनी आपल्या कुटुंबासह या सोहळ्यात हजर राहिला होता. वरातीत धोनीने जबरदस्त डान्सदेखील केला. पण यानंतर आता धोनीची एक वेगळीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

एम.एस. धोनीची व्हायरल पोस्ट (MS DHONI VIRAL POST)

शनिवारी एका एक्स (पूर्वीचे ट्वीटर) युजरने त्याच्या अकाउंटवर धोनीच्या कुटुंबासह त्याचा एक फोटो शेअर केला. पण त्या फोटोवर त्याने असं काही लिहिलं, जे वाचून त्याचे चाहते गोंधळात पडले आहेत. युजरने शेअर केलेल्या धोनीच्या पोस्टवर त्याने लिहिलं की, “या कारणामुळेच मुलींना बिहारी मुलाबरोबर लग्न करायचं नसतं.”

https://x.com/lohpurush_stark/status/1812158272516055287

महेंद्रसिंग धोनीच्या (MS DHONI VIRAL POST) कुटुंबाचा हा फोटो अनंत-अंबानी राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यातील आहे. या फोटोत महेंद्रसिंग धोनी त्याच्या पत्नी साक्षी आणि मुलगी झिवाबरोबर दिसतोय.

या फोटोमागे युजरचं नेमकं म्हणणं काय? (Troller Statement)

‘Lohpurush Tony Stark’ या एक्स अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. नेमकं हा फोटो शेअर करत या युजरला काय म्हणायचं आहे ते अजूनही अनिश्चित आहे. एका नेटकऱ्याने या ट्वीटवर रिप्लाय करत युजरला विचारलं की, “नक्की काय कारण आहे ?” यावर उत्तर देत युजर म्हणाला की, “खूप वाईट ड्रेसिंग आहे म्हणून मी असं लिहिलंय”

अर्थात अनेकाना हे कारण पटलेलं नाही आणि ते न पटण्यासारखचं आहे. यामळे काहीजणांनी “तो वर्णभेद करतोय का” याबद्दलदेखील विचारलं. पण यावरदेखील त्याने उडवाउडवीची उत्तर दिली.

धोनीच्या एका चाहत्याने या पोस्टवर “Thala for a season” असा रिप्लाय केला. तर यावर युजर म्हणाला की, “काला फॉर अ रिजन” (Kala for a reason).

युजरच्या या ट्रोलिंगमुळे अनेकांनी त्याला याची कारण विचारली असता यावर त्या युजरने प्रत्येकाला वेगवेगळं उत्तर दिलं. “बिहारी अनुवांशिकता आली”, “दोघं एकमेकांबरोबर चांगले दिसत नाहीत” अशी अनेक उत्तर दिली.

दरम्यान, या युजरने शेअर केलेली ही पोस्ट एक्सवर (MS DHONI VIRAL POST) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. ३.५ मलियन व्ह्यूज या पोस्टला आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahendra singh dhoni trolled for his color x user racist post on reason why girls dont marry bihari went viral on social media dvr