सोशल मीडियाचे जग क्रिएटीव्हिटीने भरलेलं आहे. इथे लोक आपलं टॅलेंट दाखवतात आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात स्टार बनतात. लोकांना हसवण्याच्या उद्देशाने अनेक व्हिडीओ पोस्ट केले जातात. धकाधकीच्या जीवनात लोकांना हसावे आणि निरोगी व्हावे हा या व्हिडीओ बनवण्याचा उद्देश असतो. या एपिसोडचा एक व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यास तुम्ही दिवसभर पोट धरून हसाल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही महिला कशाप्रकारे छान सजून धजून कोणत्या तरी फंक्शनसाठी निघताना दिसत आहेत. मग एक एक करून त्या गाडीत चढतात. त्यावेळी एका कोणत्यातरी अलिशान गाडीत बसत आहेत, असा भास होतो. पण यापुढे जे चित्र दिसून येतं ते पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. ती गाडी नसून चक्क एक बैलगाडी होती आणि एक माणूस ती बैलगाडी चालवत होता. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘Kacha Badam’ गाण्यावर महिलेचा हा नागिन डान्स एकदा पाहाच, पोट धरून हसाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : गिधाडाला तुम्ही कधी पोहताना पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO पाहाच
या कारचा व्हिडीओ चर्चेत आहे
हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यापासून तो खूप चर्चेत आहे. bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. एक युजर लिहितो, ‘याला खरी बैलगाडी म्हणतात.’ हैराण करून सोडणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.