महिंद्रा अॅंड महिंद्रा, टेक महिंद्रा, महिंद्रा फायनान्स या सारख्या अनेक कंपन्यांचे प्रमुख ही आनंद महिंद्रा यांची ओळख आहे. परंतु सध्या ते एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत. त्यांच्या एका ट्विटमुळे ते ट्विटर युजर्सच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
आनंद महिंद्रा यांच्या एका ट्विटचे सध्या चर्चा सर्वत्र सुरू  आहे.  आनंद महिंद्रा यांनी ‘मॅजराती बर्डकेज’ कारचा फोटो आपल्या ट्विटरवर टाकला.  नावाच्या कारचा संदर्भ घेऊन त्यांनी ट्विट केले,  ‘हा असा पिंजरा आहे ज्यामध्ये मला कैद व्हायला आवडेल’.

car_148534676372_650x425

त्यांच्या या ट्विटला एका जणाने उत्तर दिले जर तुम्हाला ही कार इतकीच आवडली तर तुम्ही ती का विकत घेत नाही. कुणी तुम्हाला रोकले आहे असे त्या व्यक्तीने म्हटले.

महिंद्रांना हा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने कधी विचार देखील केला नाही असे उत्तर त्याला महिंद्रा यांच्याकडून मिळाले. आम्ही ही कंपनीच विकत घेतली असे उत्तर  महिंद्रा यांनी शांतपणे दिले.

त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांना महिंद्रा यांना शुभेच्छा तर दिल्या त्याचबरोबर त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचेही कौतुक केले. मी आतापर्यंत अनेक प्रतिक्रिया ऐकल्या आहेत परंतु ही सर्वात चांगली असल्याचे एका ट्विटर युजरने म्हटले आहे. खरं तर २०१५ मध्येच आनंद महिंद्रा यांनी पिनिनफरीना ही इटालियन लक्जरी कारची कंपनी विकत घेतली होती. त्यांच्याकडे या कंपनीचे ७६.०६ टक्के शेअर्स आहेत.

https://twitter.com/Witty_Gandhi/status/823902908177596416

Story img Loader