Anand Mahindra: उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर कायम सक्रीय असतात. ट्विटरवरील छोट्या छोट्या गोष्टींपासून हटके, जुगाड गाड्या पाहून ते अनेकदा प्रभावित होतात. ते नेहमी व्हायरल व्हिडिओ, मॉटिव्हेशन व्हिडिओ शेअर करत असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडिंवर ते रोखठोकपणे प्रतिक्रिया देतात. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अधिक चांगल्या गोष्टी शेअर करीत असतात. त्यामध्ये अनेक असे व्हिडीओ असतात की, त्यामधून ते लोकांना चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्यांच्या व्हिडीओंमधून तरुणांना नवं काही तरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते. यावेळी देखील त्यांनी अशीच एक प्रेरणा देणारी पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे व्हिडीओमध्ये

तसेच आनंद महिंद्रा निसर्गाच्याही जवळ असल्याचं त्यांच्या अनेक पोस्टमधून दिसून येतं. दरम्यान महिंद्रा यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल! डोळ्याचं पारणं फेडणारा हा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी त्यांच्या एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला आहे. आनंद महिंद्र यांनी महाराष्ट्रातील एका प्रसिध्द धबधब्याचा व्हिडीओ शेअर करीत निसर्गाकडून माणसाने त्यातून शिकण्याचा सल्ला दिला आहे.

आनंद महिंद्रानी दिला मेसेज

महाराष्ट्रातील माळशेज घाटातील काळू धबधबा या उलट्या वाहणाऱ्या धबधब्याचा व्हिडीओ शेअर करीत कौतूक केले आहे. या धबधब्याचे पाणी पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यामुळे हवेत उलट्या दिशेने उडत असते म्हणून त्याला उलटा धबधबा म्हणतात. आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये “जेव्हा अशा अनियंत्रित संकटांचा धबधबा आपल्याला भिजवतो तेव्हा आपल्यालाही अशा संकटांना वरच्या दिशेने उडवून लावता येईल का ?” असा प्रश्न विचारला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नवरा पाहिजे गोरा गोरा” सासू सुनेचा जबरदस्त डान्स व्हायरल; VIDEO पाहून म्हणाल सासू असावी तर अशी!

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटलं, तुमची भावना आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra monday motivation shared a video of the inverted kalu waterfall in maharashtra srk