प्रत्येकाचे आयुष्यात एक तरी नवी कार खरेदी करण्याचे स्वप्न असते. अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे स्वप्न ते स्वप्नच राहते. भारतात कार हे आजही श्रीमंतीचे प्रतीक मानले जाते. एखाद्याच्या घरासमोर मोठी कार उभी असेल तर ते कुटुंब श्रीमंत असते, असे आजही मानले जाते. त्यामुळे कार खरेदीमागे आज अनेक भारतीयांच्या भावना लपलेल्या आहेत. नवीन कार खरेदी करणे हे अनेक कुटुंबांसाठी एक स्वप्न पूर्ण झाल्याप्रमाणे असते. यात कुटुंबासोबत शोरूममध्ये जाऊन कार खरेदीचा आनंद हा काही औरच असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला दिसतो. अशाच एका कार खरेदीसाठी गेलेल्या कुटुंबाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कुटुंब कार खरेदी केल्यानंतर चक्क शोरूममध्येच आनंदाने उड्या मारत नाचू लागते. या कुटंबाने महिंद्रा स्कॉर्पिओ एन एसयूव्ही कार खरेदी केली. हा व्हिडीओ ट्विटरवर @CarNewsGuru1 या हॅण्डलने पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, – किती आनंदाचे वातावरण आहे. Mahindra Scorpio-N SUV ची डिलिव्हरी घेताना लोक आनंदाने नाचू लागले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही युजर्स हे छत्तीसगडमधील असल्याचा दावा करीत आहे. जिथे महिंद्रा कारची डिलिव्हरी घेण्यासाठी पोहोचलेले कुटुंब आनंदाने चक्क नाचू लागले.
याला म्हणतात आनंद फक्त आनंद
आनंद महिंद्रा यांनी १९ मे रोजी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पोस्ट करीत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, भारतीय वाहन उद्योगात काम करण्याचा हा खरा पुरस्कार आणि आनंद आहे….त्यांच्या या ट्वीटला आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि पाच हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले की, वेटिंग पीरियडच इतकाच आहे सर की आनंद होणे साहजिकच आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, याला म्हणतात आनंद फक्त आनंद. त्याच वेळी एका युजरने हा व्हिडीओ छत्तीसगडचा असल्याचा दावा करीत लिहिले की, आमच्या छत्तीसगडची बात काही औरच आहे. तर आणखी एका युजरने मजेशीर कमेंट करत लिहिले की, हुंड्यात मिळाली असावी!. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. पण या व्हिडीओवर तुमचे काय म्हणणे आहे? मला कमेंट करून नक्की सांगा.