Tata Nano Vs Mahindra Thar Viral Video : छत्तीसगडच्या दुर्ग येथे महिंद्रा थार आणि टाटा नॅनो कारचा भीषण अपघात झाला. पद्मनाभपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पद्मनाभपूर मिनी स्टेडियमजवळ या गाड्यांचा अपघाता झाल्याची माहिती समोर आलीय. कारमध्ये असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाहीय. एक थार गाडी भरधाव वेगाने रस्यावरून जात असताना नॅनो कारला धडकली. त्यानंतर थार गाडी रस्त्यावर पलटी झाली. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जगपाल जरेदा नावाच्या युजरने या अपघाताचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.
ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटलंय, छत्तीसगडच्या दुर्ग शहरात टाटा नॅनो कार आणि महिंद्रा थार यांच्यात टक्कर झाली. त्यानंतर जे घडलं ते पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. नॅनो कारला धडक दिल्यानंतर थार गाडी रस्त्यावर पलटी झाल्याचं दिसत आहे. या अपघाताचा व्हिडीओ आणि फोटो ट्वीटरवर शेअर करण्यात आले असून महिंद्रा ग्रुपेच व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा यांना आणि आणि टाटा ग्रुपला या पोस्टमध्ये टॅग करण्यात आलं आहे.
नक्की वाचा – बापरे! बेडरुममध्ये घुसले तीन नाग, महिलेनं काय केलं? Video एकदा पाहाच
इथे पाहा व्हिडीओ
या अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, “छत्तीसगडच्या अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर थार गाडी घेताना लोक विचार नक्कीच करतील.” तर दुसऱ्या युजरने महिंद्रा यांना टॅग करत म्हटलं, सर, थार गाडीच्या स्थिरतेबाबत खूप मोठी समस्या आहे. नॅनोसारख्या कारला धडक लागल्यानंतर थार रस्त्यावर पलटी झाली. ही कार खरेदी करण्याची इच्छा होती, पण या अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कारच्या सेफ्टीबाबत मला शंका आहे.”