Sidhu Moosewala: लोकप्रिय पंजाबी गायक, रॅपर आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसेवाला यांची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. लोकप्रीय गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणामुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. मुसेवाला यांच्यावर प्रेम करणारे चाहते याप्रकरणात न्याय मिळण्यासाठी अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत. महिंद्रा थार कारमध्ये फिरणाऱ्या मुसेवाला यांच्या हत्येमुळं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. कारण मुसेवाला यांच्या एका चाहत्याने त्याची महिंद्रा थार गाडी चक्क पाण्यात टाकून हत्याप्रकरणी न्याय देण्याची मागणी केलीय. थार गाडी नाल्यात ढकलल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडालीय.
महिंद्र थार ही भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. या कारने अनेक सेलिब्रिटींना देखील आकर्षित केले आहे आणि त्यापैकी एक होता पंजाबी गायक आणि लेखक सिद्धू मुसेवाला. लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या वर्षी मे महिन्यात पंजाबमधील मानसा येथे महिंद्रा थार गाडी चालवत असताना त्यांची हत्या झाली होती. या हत्येतील अनेक गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे याचा निषेध म्हणून आणि या घटनेचा राग व्यक्त करण्यासाठी, पंजाबमधील एका चाहत्याने अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आपली महिंद्रा थार एसयूव्ही कालव्यात फेकून दिली. कालव्यात फेकल्या गेलेल्या जुन्या-जनरल महिंद्रा थारच्या मालकाने सांगितले की… “तो नवी दुसरी कार खरेदी करू शकतो; पण सिद्धू मुसेवालाला पुन्हा आणू शकत नाही”
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही अधिकारी हे एसयूव्ही थारला कालव्यातून बाहेर काढताना दिसत आहेत. कार बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Google Map ने मोडला संसार! धोका देणाऱ्या पत्नीची पोल-खोल; प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहून पती हादरला
सिद्धू मुसेवाला हा स्वतः महिंद्रा थार एसयूव्हीचा प्रचंड मोठा चाहता होता. दरम्यान सिद्धू मुसेवाला याचा खूनही याच थारमध्ये झाला, यानंतर त्याच्या कुटुंबियांनी ही कार त्याच्या आठवणीत घरी आणली. कारण महिंद्रा थार ही सिद्धू मुसेवाला याची मौल्यवान मालमत्ता होती. तो जिवंत असताना याच एसयूव्ही कारमधून प्रवास करत असे. थार व्यतिरिक्त, पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवालाकडे काही रेंज रोव्हर्स, टोयोटा फॉर्च्युनर, मारुती सुझुकी जिप्सी आणि इतर कार देखील आहेत.