Accident video viral: जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतो. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. त्यामुळे रस्ते अपघात हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर अशा अपघातांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू-काश्मीरमधील काझीगुंड येथे शुक्रवारी व्हॅनला ट्रकची धडक बसल्याने मोठा अपघात घडलाय. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गालगत लेव्हडोरा परिसरात व्हॅनने लेन बदलण्याचा प्रयत्न केला असताना हा अपघात झाला आहे. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा चेंदामेंदा झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

अंगावर रोमांच उभा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.अपघातामुळे इको वाहनातील सातही प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ काझीगुंड आपत्कालीन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुलगा लपून गुपचूप पित होता दारू, पण तेवढ्यात वडिलांनी पकडलं, VIDEO पाहून नेटकरी म्हणतात..”महागात पडलं!”

या व्हिडिओवर यूजर्सच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यांच्याकडून एकच प्रश्न केला जात आहे. तो म्हणजे, ती व्यक्ती वाचली का? असा सवाल नेटकरी करत आहेत. त्या व्यक्तीचं काय झालं? या एका प्रश्नाने नेटकऱ्यांना पछाडलेलं दिसत आहे. मात्र या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major accident happened in qazigund on national highway in which driver of a vehicle killed and several others injured video viral srk