Major Fire in Changsha China: चीनमधील चँगशा शहरातील एका उत्तुंग इमारतीला मोठी आग लागली आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सध्या तरी या अपघातामधील मृतांची आकेडवारी समोर आलेली आहे. चँगशा शहर हे हुनान प्रांताच्या राजधानीचं शहर आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये प्रमुख सरकारी कंपनीचं कार्यालय असल्याची माहितीही समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चीनमधील सरकारी वृत्तवाहिनी असणाऱ्या सीसीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, “आग लागलेल्या इमारतीच्या सर्व बाजूने धूर निघत आहे. अनेक मजल्यांवर ही आग पसरली आहे,” असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. आग विजवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहेत असंही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. ही इमारत ४२ मजल्याची आहे.

चीनमधील सरकारी दूरसंवाद कंपनी असणाऱ्या चायना टेलिकॉमचं कार्यालय या इमारतीमध्ये आहे.