तिळ गूळ घ्या गोड गोड बोला! असे म्हणत तिळाचे लाडू आणि हलवा देऊन मकरसंक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांत असेही म्हणातात पण मकर संक्रांत विषयी अशाही काही गोष्टी असतील ज्या अनेकांना ठाऊक नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Makar Sankranti 2017: म्हणून मकर संक्रांतीला पतंग उडवला जातो

१. मकरसंक्रांत असा हिंदू सण आहे जो दरवर्षी १४ जानेवारीला येतो. अपवाद वगळता २०१५ मध्ये संक्रांत १५ जानेवारीला आली होती. यादिवशी दिवस आणि रात्र समान असतात.

२. आपल्याकडे हा सण मकरसंक्रांत म्हणून ओळखला जात असला तरी भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. दक्षिण भारतात पोंगल, उत्तरेकडे लोहरी म्हणून तर गुजरातमध्ये उत्तरायण, माघी, खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो.

३. मकर संक्रांत फक्त भारतातच नाही तर नेपाळ आणि थायलँडमध्येही साजरी केली जाते. नेपाळमध्ये ‘माघी संक्रांत’ तर थायलँडमध्ये सोंक्रन या नावाने हा सण ओळखला जातो.

४. १ हजार वर्षांपूर्वी संक्रांत ही ३१ डिसेंबरला साजरी केली जायची. ही तारीख पुढे बदलत जाईल.

५. एका कथेनुसार भिष्मांनी देखील मकरसंक्रांतीच्या दिवशी आपले प्राण त्यागले होते. काही दंतकथेनुसार या दिवशी ज्या व्यक्तींचे निधन होते त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.

Makar sankrant: जाणून घ्या.. मकरसंक्रांतीचा मुहूर्त, पूजेचा विधी आणि सणाचे महत्त्व

तिळगुळ घ्या गोडगोड बोला… आपल्या प्रियजनांना द्या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…