आज १४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांत साजरी केली जातेय. या दिवशी पतंग उडवण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच उत्सुक असतात. लहान मुलं तर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. कुठे टेरेसवर जाऊन, तर कुठे छतावर जाऊन पतंग उडवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मकर संक्रांतीच्या या सणादिवशी लहान मुलांची मजा काही औरच असते. आपल्या मित्रांबरोबर पतंग उडवताना केलेली चढाओढ, तसंच स्पर्धात्मक वातावरण तयार करून कोण जिंकेल, कोण हरेल याची उत्सुकता त्या लहानग्यांच्या मनात असते. मग जिंकण्यासाठी ते काहीही करतात. सध्या पतंग उडवतानाचे आणि हा सण साजरा करत आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, अशातच आता असा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे, ज्यात पतंग उडवण्याच्या आणि स्पर्धेत टिकून राहण्याच्या नादात एक मुलगा आपलं भानच हरवून बसलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल.

पतंग उडवताना निघाली पॅंट अन्…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला पतंग उडवताना दिसत आहे. पण यादरम्यान, त्याला कसलंच भान नसल्याचं व्हिडीओतून कळतंय. पतंग उडवत असताना त्याची पँट खाली पडते; पण तरीही तो काय पतंग उडवणं बंद करत नाही. पँट तशीच खाली पडलेल्या अवस्थेतच तो पतंग उडवण्याचा आनंद घेत असतो.

चिमुकल्याचा हा व्हिडीओ @sukun_e_kashi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला “पँट उतर जाये, पर पतंग ना उतर पाये” अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

हेही वाचा… कोण कोणत्या रुपात येईल ते सांगता येत नाही! तो अपहरण करायला आला पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की…, पाहा थरारक VIDEO

लहान मुलाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरेनासं झालं आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “परिस्थिती कोणतीही असो, तुमच्या उद्देशापासून विचलित होऊ नका.” तर दुसऱ्यानं “परिस्थिती कोणतीही असो, तुमच्या उद्देशापासून विचलित होऊ नका” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “दोन्ही बाजूंनी भावाची इज्जत पणाला लागली आहे.”

हेही वाचा… लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून हशा पिकला आहे. लहान मुलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना, हा व्हिडीओ वाराणसीचा असल्याचं म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti 2025 funny video of a kid flying a kite with pants falls down viral video dvr