Makarsankranti Marathi Wishes HD Images Free Download: मकरसंक्रांत म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येतात ते उंच भरारी घेणारे पतंग आणि तिळ-गुळाचे स्वादिष्ट लाडू. एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देताना त्याच जुन्या मेसेजला फॉर्वर्ड करण्याची वेळ येऊ नये याची सोय आता आम्ही केली आहे. मकर संक्रांतीचा गोडवा जपणारी व सांगणारी काही शुभेच्छापत्र आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. लगेचच हे फोटो डाउनलोड करून तुम्ही तुमच्या Whatsapp Status, Instagram स्टोरीज, फेसबुक पोस्टसह अन्य माध्यमातून तुमच्या मित्रांना, प्रियजनांना पाठवू शकता. गोडव्याची चव थोड्याश्या कडुपणाने वाढते असं म्हणतात त्यामुळे काही मजेशीर शुभेच्छा सुद्धा खास समाविष्ट केल्या आहेत. चला तर मग पाहूया गोड गोड मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

मकरसंक्रांती मराठी शुभेच्छा

१) एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला.
खुद्कन हसला, हातावर येताच बोलू लागला..
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला

11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
today horoscope 10th November rashi bhavishya akshay navami 2024
Today Horoscope : अक्षय नवमीला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब चमकणार; लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर होणार का धनवर्षाव? वाचा राशीभविष्य
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

२) नात्यातील कटुता इथेच संपवा….तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

३) झाले– गेले विसरुन जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…

४) नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे
तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

५) तुमच्या यशाचा पतंग उंचच उंच उडत राहो हीच सदिच्छा
शुभ मकर संक्रांती, तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

लोकसत्ता ऑनलाईनच्या वतीने सुद्धा तुम्हाला या मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! तुम्ही आहात तसेच गोड राहा.