Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते.भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान अशाच एका तरुणानं भन्नाट जुगाड केला आहे, हा जुगाड पाहून तुम्हीही या तरुणाचा कौतुक कराल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय केलं या तरुणानं? तर या तरुणानं चक्क शेणापासून विज तयार केलीय. याचा व्हिडीओही सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुणानं एका भांड्यात पाणी घेतलं, मग त्यामध्ये शेण आणि कपडे धुण्याची पावडर मिक्स केली. मग या मिश्रणात वीजेची तार टाकली. अशा पद्धतीनं वीज तयार झाली. या वीजेवर तरुणाने पंखा, बल्ब, मोबाईल त्यानं चालवून दाखवली. यामध्ये तुम्ही पाहू शकता, खरंच बल्ब पेटला आणि पंखाही फिरला. भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही. लोक असे काही जुगाड शोधून काढतात जे पाहून थक्क व्हायला होतं. एखादी महागडी गोष्ट परवडत नसेल त्यावेळी हे लोक काही ना काही जुगाड करुन त्या गोष्टी मिळवण्याचा किंवा हुबेहुब बनवण्याचा प्रयत्न करतात. मग ती एखादी महागडी गाडी असो वा विजेवर चालणारी यंत्रणा.सध्या असाच एक जुगाड सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पठ्ठ्यानं अख्खं घरच उचलून दुसरीकडे नेलं; ‘होम डिलिव्हरी’चा हा VIDEO पाहून चक्रावून जाल!

@Imjytk या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला २ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लोक हा व्हिडिओ लाइक करत आहेत. तसंच यावर भरभरून कमेंट्सही करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make electricity from gobar and washing powder desi jugaad video viral on social media srk