रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्यांवरचे पदार्थ अनेक जण खातात. असे काही पदार्थ विशिष्ट चवीमुळे प्रसिद्ध होतात. हातगाडीवर हे पदार्थ तयार करताना स्वच्छता बाळगली जात आहे का किंवा संबंधित हातगाडीच्या परिसरात स्वच्छता आहे का, याकडे नकळत दुर्लक्ष केलं जातं. असे पदार्थ तयार करताना किंवा हातगाडीच्या परिसरातल्या अस्वच्छतेबाबत यापूर्वी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.मात्र हे पदार्थ कुठे बनतात कसे बनतात याबद्दल आपल्याला काही माहित नसते. असाच एक किळसवाना व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण सगळेच भेळ आवडीने खातो, त्यामध्ये कुरमुरे मोठ्या प्रमाणात असतात. मात्र हेच कुरमुरे बनवतानाचा एक किळसवाणा प्रकार सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीपासून मुरमुरे तयार करण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मुरमुरे बनवणारे कर्मचारी अतिशय अस्वच्छ दिसत आहेत. त्यांचे कपडेही मळलेले आहेत. तांदळापासून तयार केले जाणारे हे मुरमुरे. ज्या पाण्यात तांदूळ धुतले जात आहेत, त्याच पाण्यात हा कर्मचारीही आहे. त्यानंतर पायांनी ते तुडवले जात आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: नारीशक्ती! कर्नाटकात नराधमानं तरुणीची काढली छेड, तरुणीनं एकटीनं दाखवला इंगा

‘स्वच्छता पाळा, आजार दूर ठेवा’ असं म्हटलं जातं. त्यामागे मोठा अर्थ आहे. घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवल्यास रोगराई येत नाही आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. या नियमाचं पालन अन्नपदार्थ तयार करतानादेखील महत्त्वाचं आहे; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणाऱ्यांनी पाहिला, तर त्यांना नक्कीच धक्का बसेल.