सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. कधी रस्त्यावर नाचताना दिसतात, तर कधी रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टवर. थोड्याशा प्रसिद्धी लोक अनेकदा आपला जीव धोक्यात घालतात. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आगमापूर गावाजवळ एका तरुणाचा जीव धोक्यात घालत पाण्याच्या जोरदार प्रवाह ओलांडताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहात एक तरुण पाइपलाईनच्या सहाय्याने नदी ओलांडत आहे, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
तरुणांकडून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर रिल करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला जात आहे. यावेळी काही लोक प्रेक्षक बनले आहेत. अशावेळी थोडा निष्काळजीपणाही जीवावर बेतू शकतो. या ठिकाणी तरूण जीवघेणा स्टंट करत आहे तेही फक्त रिलसाठी. तेथे पुरामुळे पोलीस व लेखापालांची ड्युटी लावण्यात आली. मात्र तरुणांना रिल बनवण्यापासून कोणीही रोखले नाही. तिथे उपस्थित सर्व लोक पाहत उभे आहेत.
हेही वाचा – पेट्रोलचे पैसे मागितले म्हणून पोलिस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, Video Viral
शाहाबाद परिसरामध्ये गर्रा नदीला पुर आल्याने गेल्या काही दिवसांपासून पाण्याची पातळी वाढल्याने शहादाबाद पाली मार्गावर अगामपूर गावातील पुल वाहून केला. त्यामुळे रस्ता मधोमध तुटल्याने लोकांना रस्ता ओलांडणे शक्य नव्हते. दरम्यान पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु असताना एक तरुण स्वत:चा जीव धोक्यात टाकून पूल ओलांडत होता. दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या एका प्लास्टिक पाईपवर बसून हा तरुण रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. थोडीही चूक झाली असती किंवा पाईप तुटला असता तर हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असता. व्हिडीओ बनवण्यासाठी तरुणाने हा धोका पत्करला आहे. व्हायरल व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. इतरांनी अशी चूक करू नये असे आवाहन केले जात आहे.
सध्या पावसाळा सुरु झाला असून देशभरात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीमध्ये लोकांनी स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात जाईल असे वागू नये. वर्षाविहार आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी सावधिरी बाळगावी.