प्रत्येकालाच वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहचायचं असतं. घाईघाईत आपण घरातून निघतो रिक्षा,बस, ट्रेन मिळेल ते पकडून इच्छित ठिकाणी पोहचन्यासाठी स्ट्रगल करतो. त्यात मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण आपण सारेच जाणतो. अक्खी मुंबई लोकलने प्रवास करते.अशावेळी गर्दीचा किंवा ट्रेनचा अंदाज लागत नाही आणि काही अपघात होतात. तर काहीवेळा निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागतो असाच एक काळीज पिळवटून टाकणाऱ्या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जलद ट्रेनच्या धडकेत हा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हात धुवायचं निमित्त ठरलं…

मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तीनवर जेवणाचा डबा धुण्यासाठी उभे असताना अचानक आलेल्या जलद लोकलचा धक्का लागून अपघात घडला या अपघातात एक सतरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.मयंक अनिल शर्मा (१७ वर्षे) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.तो मालाड मालवणी येथील राहणारा आहे.

हेही वाचा – ८० लाख वेळा लिहीले रामाचे नाव; वयाच्या ९४ व्या वर्षीही सुब्बलक्ष्मी यांची अद्भुत भक्ती

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, प्रत्यक्षात तो प्लॅटफॉर्मवर ट्रॅकजवळ उभा राहून हात धुत होता. इतक्यात ट्रेन रुळावर आली. या मुलाचे डोके रेल्वेच्या इंजिनला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये एक मुलगा प्लॅटफॉर्मवर उभा आहे आणि रुळांवर हात धुत आहे. हात धुऊन झाल्यावर तो पाणी पिऊ लागतो. दरम्यान, दुसरा मुलगा त्याच्याकडून बाटली घेतो आणि हात धुवायला लागतो. तेवढ्यात एक लोकल ट्रेन रुळावर येते. ट्रेनचे इंजिन त्या मुलाच्या डोक्यावर आदळले आणि तो ट्रेनपासून लांब फेकला गेला आणि प्लॅटफॉर्मवर पडला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – पुत्र व्हावा ऐसा…! वडिल टोलनाक्यावर झाडू मारत होते; मुलगा पोलीस भरती झाला, धाय मोकलून रडू लागले बाप-लेक..

घटनास्थळी उपस्थित असलेला त्याचा मित्रही जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत अशून नेटकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. मित्रावर चालून आलेला काळ त्याचाच काळ ठरला अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.