क्रिकेटच्या सामन्यात सीमारेषेवर चौकार किंवा षटकार रोखण्यासाठी खेळाडूंचे अविश्वसनीय प्रयत्न तुम्ही पाहिलेच असतील. मात्र, असाच प्रयत्न करण्याच्या नादात एक महिला खेळाडूने आपल्या कृत्यातून लोकांना पोट धरून हसवले आहे. तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

ही घटना महिला आशिया कपमध्ये घडली आहे. यात खेळाडू चौकार वाचवण्यासाठी सीमारेषेच्या पुढे गेल्यानंतरही प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. मलेशिया आणि थाईलँड महिला क्रिकेट संघामध्ये हा सामना सुरू होता. यामध्ये सीमारेषेकडे जाणारा चेंडू अडवण्यासाठी महिला खेळाडू सीमारेषेजवळ डाईव्ह मारते. ती चेंडूला रेषेपार जाण्याचे थांबवते. पण या प्रयत्नात ती स्वत: रेषेबाहेर पडते. पण तेवढ्यावर न थांबता ती आत असताना देखील सीमारेषेजवळ येणाऱ्या चेंडूला हात लावून त्यास दूर सारते. नंतर अम्पायरने चौकारचा इशारा दिला. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून पोट धरू हसत आहेत.

(VIRAL VIDEO : रुग्णासाठी लिफ्ट ठरली धोकादायक, पाहा १७ सेकंदांचा जीवन मरणाचा थरार)

मलशिया टीमच्या खेळाडूच्या प्रयत्नांचे काही नेटकरी कौतुक करत आहेत, तर काही लोक तिच्या कृत्यावर हसत देखील आहे. @GemsOfCricket या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ हजार ९५२ लाइक्स मिळाले आहेत.

दरम्यान नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहिला प्रयत्न तर जोरदार होताच आणि त्यानंतरचा त्याच्याहीपेक्षा जोरदार असल्याचे म्हणत एका युजरने खेळाडूची थट्टा केली आहे. तर, ‘शी वॉज स्टन्डिंग आऊट, सो इट वॉझ आऊटस्टॅन्डिंग’ असे गमतीने एकाने म्हटले. तर एकाने प्रयत्न चांगले होते, पण परिणाम चुकीचे निघाले, असा टोला मारला.