Male teacher viral video: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं गुरु-शिष्याप्रमाणे असतं. शिक्षकाकडून मिळालेली विद्येची शिदोरी आयुष्यभर जोपासण हे खरंतर विद्यार्थ्याचं काम. लहानपणी अनेकांनी शिक्षकांचा ओरडा खाल्ला असेल, मार खाल्ला असेल; पण कधीही शिक्षकांचा अनादर करणं आपल्याला शिकवलं जात नाही. विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी खूप जास्त आदर असतो. आई-वडिलांनंतर जर आपण कोणाचं ऐकतो तर ते शिक्षक असतात. पण, जर शिक्षकानेच मर्यादा ओलांडल्या तर… , कारण या कलियुगात कधी काय घडेल ते सांगता येत नाही.
सध्या शिक्षकाच्या अश्लील वर्तनाची एक धक्कादायक घटना एका ठिकाणी घडलीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक शिक्षक विद्यार्थिनीबरोबर अश्लील कृत्य करताना दिसतोय. नेमकं असं घडलंय काय, जाणून घेऊ या…
शिक्षक की नराधम
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये शाळेतील एका केबिनमध्ये एक शिक्षक आपल्या कामात असतात. तितक्यात त्या केबिनमध्ये एक विद्यार्थिनी येते. विद्यार्थिनी केबिनमध्ये येताच शिक्षक तिला मिठी मारतात आणि तीदेखील यावर काहीच आक्षेप न घेता त्यांना मिठी मारते. यादरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @law_of_marriage या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “आई-वडील कोणावर विश्वास ठेवतील. मुलीची इज्जत कुठेही सुरक्षित नाही,” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.१ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं “अरे तुझ्या मुलीसारखी ना ती?”, तर दुसऱ्याने “यात दोघांचीही चूक आहे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “याला म्हणतात दिशाभूल करणं. मुलगी अल्पवयीन आहे, ती समजूतदार असती तर तिने असे काही केले असते का? शिक्षकाने तिची दिशाभूल केली आहे.”