पुण्यात कधी काय चर्चेत येईल याचा काही नेम नाही. पुणेकर नेहमी असे काही ना काही करतात त्यामुळे त्यांची नेहमीच चर्चा होत असते. पुणेरी पाटी असो किंवा पुणेरी व्यक्ती चर्चाही होतेच. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील व्हिडीओची चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये एक कारचा आहे. पण नक्की ही कार का चर्चेत आली आहे ते जाणून घेऊ या…

पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांची ओळख आहे. खास पुणेरी शैलीतील या पुणेरी पाट्या अनेकदा मजेशीर असतात ज्या नेटकऱ्यांना प्रचंड आवडतात. पुणेरी पाट्यांची चर्चा तर पुण्यात नेहमीच होत असते पण आजकाल कार, ट्रकमागे लिहिलेल्या खास मेसेजची चर्चा देखील होत असते. अशाच एका कारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओमधील ही कार पुण्यातील आहे. कारच्या पाठीमागे मालकीणबाई असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”प्रेम करावं तर MH12 पुणेकरांसारखं”

हेही वाचा – “बाप-लेकाची भन्नाट जोडी!”, मुलाने हटके स्टाईलमध्ये दिलं खास गिफ्ट, वडीलांची प्रतिक्रिया पाहून पोट धरून हसाल, पाहा Viral Video

प्रेम असो किंवा स्पर्धा, कोणत्याही गोष्टीत पुणेकर कधीही हार मानत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी पुणेकर काहीही करू शकतात हे काही सांगण्याची गोष्ट नाही. मग ती कार असो किंवा खास व्यक्ती असो, पुणेरी व्यक्ती दोघींवरही जीवापाड प्रेम करते. प्रेम व्यक्त करण्यासाठी पुणेरी लोक नेहमीच काही ना काही हटके पर्याय शोधत असतात. सध्या एका पुणेरी तरुणाने चक्क कारमागे मालकीणबाई लिहिलेले आहे. आता हा Video पाहून अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, पुणेरी कारमालकाची ही मालकीण बाई नक्की आहे तरी कोण? मालकीणबाई हा शब्द कारला उद्देशून लिहिला आहे की, कोणी खास व्यक्तीसाठी लिहिला आहे?

हेही वाचा – “ग्राहक हेच आमचे दैवत हे सत्य आहे पण…”, हे फक्त पुण्यातील दुकानदार करू शकतात, पुणेरी पाटी चर्चेत, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटत?