आपली आई आपल्यासाठी किती धडपड करते ना! म्हणजे आपल्याला हवं नको ते सगळं बघते. चोवीस तास नेहमी आपल्या आवडीनिवडींचा विचार करते. वेळ प्रसंगी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभीही राहते. प्राण्यांमध्येही तसंच असतं. त्यांचीही आई तशीच असते, आपल्या पिल्लासाठी काहीही करायला ती तयार होते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओच पाहा ना! एका घराच्या कुंपणात अस्वलीण आणि तिचे छोटे पिल्लू शिरले. कुंपण ओलांडून आई सहज पलिकडे गेली पण एवढ्याशा पिल्लाला काही केल्या वर चढता येईना. बिचारं पिल्लू! जणू आई मला वर उचलून घे ना! असंच तिला सांगत असावं. आपल्या मुलाला वर खेचण्यासाठी कुंपणावर चढून आईही धडपड करत होती.  या अस्वलीण आणि तिच्या गोंडस पिल्लाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या पिल्लाला आईने कुंपणापलीकडे कसं नेलं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओच बघावा लागेल.

Story img Loader