लहान मुले खूप निरागस असतात. ते कधी काय करतील सांगता येत नाही. अनेकदा त्यांच्या कृतीने आपण थक्क होतो. लहान मुलांना समजून घेणे आणि समजावून सांगणे, या दोन्ही गोष्टी कठीण असते. अनेकदा इच्छा असूनही आपण त्यांना काही गोष्टी समजावून सांगू शकत नाही. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला एका मामाच्या फोटोचा लाड करताना दिसत आहे. हा चिमुकला ज्या प्रकारे फोटोचा लाड करत आहे, त्याला हे माहीत सुद्धा नसेल की त्याचा मामा या जगात नाही. हो चिमुकला ज्या मामाचा लाड करत आहे, तो मामा २०२४ मध्ये जग सोडून गेला आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्याच्या मामाची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक चिमुकला त्याच्या मामाचा फोटोजवळ उभा आहे आणि फोटोतील मामाचा लाड करत आहे. तो ‘मामा ये ये’ असा हाक मारताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे मामाच्या या फोटोवर मृत्यूची तारीख लिहिलेली दिसत आहे. या चिमुकल्याचा मामा म्हणजेच राहूल नाईकचा हा १ डिसेंबर २०२४ रोजी मृत्यू झाला. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना अश्रु आवरणार नाही.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

kajal_naik_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “याला कोण सांगणारे… आता मामा कधीच परत येणार नाही ये, राहुल तुझी कमी कायम रेवांशला भासत राहील.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पाणी आलं यार पाहून डोळ्यात” तर एका युजरने लिहिलेय, “अंगावरती काटा येतो ब्लड प्रेशर वाढतो असे व्हिडिओ पाहून. अशी वेळ शत्रूच्या पण घरी येऊ नये. खूपच वाईट वाटलं” तर एका युजरने लिहिलेय, “काळजाचं पाणी केल रे बाळा.. प्रेम करणारा लाड करणारा मामा देवा घरी गेला रे बाळा. किती बोलावलं तरी मामा येणार नाही हे या निरागस बाळा ला कसं सांगेल कुणी” आणखी एका युजरने लिहिलेय, “मामा भाच्याची जोडी एक नंबर आसते कारण मामा तो मामाच असतो” एक युजर लिहितो, “माझ्या बहिणीचे लेकरू पण असंच जीव लावतात यार मला” तर एक युजर लिहितो, “कोणी कोणाच्या नशिबाला पुरत नाही. आलेली वेळ सांगून येत नाही. घटना घडल्याशिवाय राहत नाही. जाणारा जातो पण अशा आठवणी सोडून जातो सगळ्यांसाठी” अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत.

Story img Loader