Mamata Banerjee Viral Photo Is Fake: तृणमूल काँग्रेसने त्यांच्या एक्स हँडलवरून काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी दुखापतग्रस्त झाल्या होत्या. उपचारानंतर काही दिवसात ममता बॅनर्जी यांची प्रकृती सुधारली आणि आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टीएमसी पक्षाच्या नुकत्याच झालेल्या जोनो गोर्जॉन सभेची गर्दी दाखवणारा फोटो व्हायरल झाला आहे. “ममता बॅनर्जी स्टेजवर असताना गर्दीचा दणदणीत जयघोष” असे कॅप्शन देत हा फोटो तुफान शेअर केला जात आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना प्रत्येक पोस्टवर किती विश्वास ठेवावा हा प्रश्नच आहे. अशातच आता, लाइटहाऊस जर्नलिज्मला तपासादरम्यान या फोटोची वेगळी बाजू दिसून आली आहे. ही खरी बाजू नेमकी काय हे पाहूया ..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Trinamool Supporters ने व्हायरल फोटो आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील हे फोटो शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरु केला. आम्हाला X वापरकर्ता Sudhanidhi Bandopadhyay यांनी शेअर केलेला फोटो आढळून आला.

वापरकर्त्याने नमूद केले होते की ही प्रतिमा आनंदबाजार पत्रिकेच्या पाचव्या पानावर दिसली होती आणि काही सोशल मीडिया वापरकर्त्यांद्वारे शेअर केलेल्या फोटोच्या तुलनेत कमी गर्दी मूळ फोटोमध्ये दिसून आली होती. त्यानंतर आम्ही ११ मार्च २०२४ रोजीचा आनंदबाजार पत्रिकेचा तपास केला.

https://epaper.anandabazar.com/calcutta/2024-3-11/71/Page-1.html

हे ही वाचा<< असदुद्दीन ओवेसी भाषणात गाऊ लागले शिव तांडव स्तोत्र? ‘त्या’ सभेत नेमकं असं घडलं तरी काय, पाहा Video

निष्कर्ष: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जोनो गोर्जॉन सभेतील गर्दी दाखवणारा फोटो चुकीचा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee injured photo led to new image gone viral suspected to be fake rally of tmc after loksabha election dates declared svs