Mamata Banerjee Viral Photo Is Fake: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी गंभीर दुखापतग्रस्त झाल्या होत्या. यात त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी जखम झाली होती. यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, ममता बॅनर्जी यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पण, दुखापतग्रस्त झाल्यानंतरचे त्यांचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले. यातील अनेक फोटोंत ममता बॅनर्जी यांच्या कपाळाच्या मध्यभागी जखम झाल्याचे दिसत होते, पण यात असा एक फोटो व्हायरल होत होता, ज्यात ममता बॅनर्जींच्या कपाळाच्या डाव्या बाजूला बँडएड लावलेली दिसत होती. याच फोटोंवरून आता ममता बॅनर्जींच्या कपाळावर झालेली ‘ती’ जखम खोटी असल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता लाइटहाऊस जर्नालिझमने तपासादरम्यान ममता बॅनर्जींच्या कपाळावरील जखमेसंबंधित त्या दोन वेगवेगळ्या फोटोंमागची एक खरी बाजू समोर आणली आहे. ही खरी बाजू नेमकी काय आहे पाहूयात.
ममता बॅनर्जींच्या कपाळावर झालेली ‘ती’ जखम खोटी? समोर आली फोटोंमागची खरी बाजू
Mamata Banerjee Viral Photo Facts: ममता बॅनर्जींच्या कपाळावरील जखमेसंबंधित त्या दोन वेगवेगळ्या फोटोंमागची खरी बाजू काय आहे पाहूयात.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-03-2024 at 16:31 IST
TOPICSट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoतृणमूल काँग्रेसTMCममता बॅनर्जीMamata Banerjeeलाइटहाऊस जर्नलिझम - Lighthouse JournalismFact Checkव्हायरल न्यूजViral News
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee injured viral photo two unrelated incidents are being shared as proof of mamata banerjee faking her recent head injury sjr