स्पेन दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ स्वतः ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ममता बॅनर्जी स्पेनची राजधानी माद्रिदमधील (Madrid) एका पार्कमध्ये जॉगिंग करताना दिसत आहेत. ममता बॅनर्जीबरोबर त्यांच्या टीमचे अनेक सदस्य देखील आहेत. इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की. ‘रिफ्रेशिंग मॉर्निंग. एक चांगला जॉग तुम्हाला पुढच्या दिवसासाठी उत्साही ठेवतो. तंदुरुस्त राहा, निरोगी राहा!” ममता बॅनर्जींच्या या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे कारण त्या साडी नेसून आणि चप्पल घालून जॉगिंग करत होत्या.
ममता यांनी स्वतःचा व्हिडिओ शेअर केला
ममता बनर्जी यांनी आपल्या हातात स्मार्टवॉच देखील बांधले आहे. त्या रोज ट्रेडमिलवर चालण्यासाठी ओळखल्या जातात. २०१९च्या एका व्हिडिओमध्ये त्या दार्जिलिंगच्या पर्वतांमध्ये जॉगिंग करताना दिसल्या होत्या. त्या त्यांच्या टीमच्या सदस्यांबरोबर १० किलोमीटरच्या जॉगिंगवर निघाल्या होत्या.
सध्या त्यांनी शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये त्या पार्कमध्ये हार्मोनिएमसारख्या वाद्यावर एक धुन वाजवताना दिसत आहे. ममता बनर्जी आज लोकप्रिय फुटबॉल लीग ‘ला लीगा’च्या अध्यक्षांची मुलाखत घेणार आहेत अशी माहिती मिळते आहे.
हेही वाचा – ‘बादल बरसा बिजुली’ गाण्यावर चिमुकल्याने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते
ममता बॅनर्जी ११ दिवसांच्या स्पेन, दुबई दौऱ्यावर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी स्पेन आणि दुबईच्या ११ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. यावेळी त्या राज्यातील गुंतवणुकीसाठी बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार आहेत. ममता बॅनर्जी आधी दुबईला पोहोचल्या आणि तिथून स्पेनला गेल्या. जाण्यापूर्वी राज्य सचिवालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ‘आम्ही तीन दिवस माद्रिदमध्ये राहणार आहोत. यावेळी आम्ही एका व्यावसायिक शिखर परिषदेत सहभागी होऊ आणि अनिवासी बंगाली लोकांना भेटू. तेथून आम्ही बार्सिलोनाला ट्रेनने जाऊ, जिथे आम्ही ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समिट’ (BGBS) च्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होऊ. पाच वर्षांतील त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा असेल कारण केंद्राने त्यांना यापूर्वी आवश्यक परवानगी दिली नव्हती.” ममता बॅजर्जी २३ सप्टेंबरला कोलकात्याला परतण्यापूर्वी दीड दिवस दुबईत राहतील.
हेही वाचा – Viral Video : आईच्या लग्नामध्ये लेकाने लावली हजेरी; सावत्र वडिलांना म्हणाला, ”तुम्ही…
विरोधी आघाडी ‘भारत’चे नेतृत्व करणार का ममता बॅनर्जी?
बुधवारी दुबई विमानतळावर श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल यांची बॅनर्जीं यांची भेट घेतली. याबाबत ममता यांनी सांगितले की, ”विक्रमसिंघे यांनी त्यांना विमानतळाच्या लाऊंजमध्ये पाहिल्यानंतर ‘कुठल्यातरी विषयावर चर्चा करण्यासाठी’ बोलावले होते.
विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जी यांना मजेशीरपणे विचारला की, ‘त्या विरोधी पक्षांच्या युती असलेल्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’चे (इंडिया) नेतृत्व करणार आहेत का? बॅनर्जींनाही यांना प्रश्न ऐकून आश्चर्य वाटले.
त्यांनी प्रत्युत्तर दिले, ‘जर लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला तर आम्ही उद्या या स्थितीत (सत्तेत) असू. ‘ भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र येईल. याचा सामना करण्यासाठी, २४ हून अधिक विरोधी पक्षांनी ‘डियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ची स्थापन केली आहे.