एखाद्या महागड्या वस्तूंच्या दुकानात तुम्ही गेलात तर ठिकठिकाणी ‘वस्तूंना हात लावू नका’ अशा सूचना केलेल्या दिसतात. पण सूचना ऐकतील ते ग्राहक कसले. काही ग्राहक बजाहूनही आपल्याला करायचे तेच करतात पण अशा वागण्यामुळे बरेचदा त्यांच्या हातून ती वस्तू तुटते आणि सगळ्यांसमोर शरमेने मान खाली घालायची वेळ येते. असाच काहीसा प्रकार एका ग्राहकासोबत घडला.
इंग्लडमधल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात एक ग्राहक टीव्ही पाहत होता. इतर ठिकाणी पाहणी करुन झाल्यानंतर त्याचे लक्ष प्रदर्शनासाठी ठेवलेल्या टीव्ही संचाकडे जाते. टीव्हीला हात लावण्याचा मोह त्यालाही अनावर होतो. या टीव्हीची चाचपणी करत असतानाच त्याच्या सौम्य धक्का टिव्हीला लागतो त्या धक्क्याने एका मागोमाग एक ठेवलेले दोन्ही टीव्ही जमीनीवर पडून फुटतात. पण हे इथेच थांबत नाही तो घाबरून उभा राहत असताना त्याच्या मागे ठेवलेल्या आणखी दोन टीव्ही संचालाही त्याचा हात लागतो आणि तेही टीव्ही संच काही सेंकदाच्या आत जमीनीवर पडून फुटतात. विशेष म्हणजे हे चारही टीव्ही चांगल्या ब्रँडचे असून त्यांची किंमत ही जवळपास चार लाखांहूनही अधिक होती.
ग्राहकाच्या हातून घडलेल्या या प्रकारामुळे तिथल्या कर्मचा-यांनी देखील डोक्यावर हात मारला. आपण मोठे नुकसान केले हे पाहून या ग्राहकाने देखील शरमेने मान खाली घातली. या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात हा प्रकार कैद झाला. नंतर या दुकानाने फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आणि अल्पावधीतच तो इंटरनेटवर व्हायरल झाला. दुकानातील हे लाखो किंमतीचे टीव्ही पुन्हा कंपनीकडे पाठवण्यात आले आहेत पण या ग्राहकाने नुकसान भरपाई दिली की नाही हे मात्र समजू शकले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा