Paragliding Shocking Video Viral : सोशल मीडियावर अनेक थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही भयानक व्हिडीओही मजेशीर वाटतात. कारण खतरनाक स्टंटबाजी करतानाही काही लोक मजेशीर कृत्य करतात आणि लोकांचं मनोरंजन करत असतात. पॅराग्लायडिंगचा असाच एक भन्नाट व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. पॅराग्लायडिंग करणाऱ्या दोन तरुणांपैकी एक जण आकाशात अचानक बेशुद्ध होतो आणि काही वेळानंतर त्याचे डोळे उघडताच तो असं काही कृत्य करतो, जे पाहून इंटरनेटवर अनेकांचा हशा पिकला आहे. पॅराग्लायडिंगचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही करत आहेत.
१५ सेकंदाच्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. परंतु, त्याची परिस्थिती पाहून तु्म्ही अंदाज लावू शकता की, त्याला पॅराग्लायडिंग करताना आनंद वाटत नाहीय. त्याचं तोंड उघडलेलं आहे मान लटकलेली आहे आणि पाठीमागे बसलेला इन्स्ट्रक्टर त्याची अशी अवस्था पाहून हसत आहे. भीतीमुळे किंवा अतिउत्साहामुळे तो व्यक्ती बेशुद्ध होतो. त्यानंतर गाईड त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्या व्यक्तीला जाग येते आणि तो जोरजोरात ओरडू लागतो.
इथे पाहा व्हिडीओ
@Enezator नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, उत्साहामुळे बेशुद्ध झाला. या व्हिडीओला आतापर्यंत ७८ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं, हा भीतीमुळे बेशुद्ध झाला आहे. तर अन्य एका यूजरने म्हटलंय की, मला वाटत नाही, तो उत्साहामुळे बेशुद्ध झाला असेल.