समाजामध्ये अशी अनेक लोकं असतात त्यांना विनाकारण मुक्या प्राण्यांना त्रास देण्याची सवय असते. कधी कुत्र्याला कारला बांधून फरफटत नेणारे, तर कधी त्यांच्या शेपटीला फटाके बांधून त्रास देणाऱ्या लोकांचे आपण अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. मात्र, मुक्या प्राण्यांना त्रास देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. उंदराला विनाकारण मारल्यामुळे एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गु्न्हा नोंदवला असून त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांना त्रास देणाऱ्यांसाठी हा चांगला धडा शिकवल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यातील मनोज कुमार नावाच्या व्यक्तीवर उंदराला क्रूरपणे मारल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. शिवाय हे प्रकरण इतके वाढलं आहे की, मृत उंदराचे चक्क पोस्टमॉर्टम करण्यात आलं आहे. काय आहे ही नेमकी घटना सविस्तर जाणून घेऊयात.

हेही पाहा- पोट की पैशांचा खजिना? रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी काढली तब्बल १८७ नाणी

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील मनोज कुमार नावाच्या व्यक्तीने उंदराच्या शेपटीला दगड बांधून नाल्यात फेकून दिल्याचं प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा यांनी पाहिलं. शिवाय शर्मा यांनी मनोजने नाल्यात फेकून दिलेल्या उंदराला नाल्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केला, पण तो उंदीर तोपर्यंत मरण पावल्याचं शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. विकेंद्र शर्मा ‘पीपल्स फॉर अॅनिमल्स’ या संस्थेशी संबंधित आहेत.

या घटनेनंतर विकेंद्र शर्मा यांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मनोज कुमारच्या विरोधात आयपीसीच्या कलम ४२९ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कलम ११(१) (एल) नुसार गुन्हा नोंदवला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकेंद्र यांनी केलेल्या तक्रारीमुळे मृत उंदराचे पोस्टमॉर्टम देखील बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (IVRI) करण्यात आले आहे.

हेही वाचा- Video: हवेतून उडणारं विमान थेट विजेच्या तारांमध्ये घुसलं, ९० हजार घरात…

या घटनेची सर्व माहिती विकेंद्र शर्मा यांनीही आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण २४ नोव्हेंबरचे असून एका व्यक्तीने उंदराच्या शेपटीला दगड बांधून नाल्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आपण त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तरीदेखील आरोपीने उंदराला नाल्यात बुडवलं. यानंतर आपण नाल्यात उडी मारून उंदराला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत तो मेला होता. या घटनेचा जाब देखील आरोपी मनोज कुमारला विचारला असता त्याने “मी असंच उंदरांना मारतो आणि यापुढे देखील असंच मारत राहणार तुला जे करायचे ते कर”, अशी धमकी दिल्याची माहिती शर्मा यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान, “अनेकजण या घटनेला विनोद म्हणून घेत आहेत. मात्र, या संपुर्ण घटनेत आरोपीच्या क्रूरपणाचा मु्द्दा आहे. त्याने उंदराला अतंत्य निर्दयीपणे मारले शिवाय भविष्यातही असेच करणार अशी धमकी देखील देतो हे भयानक आहे” अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली आहे.

पोलिसांनी केली कारवाई –

हेही पाहा- पोलिसाने दिला महिलेला धक्का, जमिनीवर लोळत आरडाओरडा करणाऱ्या महिलेचा Video पाहून नेटकरी संतापले

शर्मा यांच्या तक्रारीवरून बदायूं पोलिसांनी आरोपी मनोज कुमारला पोलिस ठाण्यात बोलावून त्याची चौकशी केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणी आरोपीला अद्याप अटक झाली आहे की नाही? याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

तर विकेंद्रने पोलिस ठाण्यामध्ये जो उंदराचा मृतदेह ठेवला होता. त्याचे पोस्टमॉर्टमही बरेली येथे करण्यात आले असून पोस्टमॉर्टम अहवाल येणं बाकी आहे. तर आरोपी मनोजला अटक करण्यात आली होती, पण त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती देखील शर्मा यांनी दिली आहे.

आरोपीला काय होऊ शकते शिक्षा?

आयपीसीच्या कलम ४२९ नुसार कोणत्याही प्राण्याला मारणे किंवा अपंग करणे हा गुन्हा असून, एखाद्या प्राण्याला मारले, विष दिले किंवा त्याला अपंग केले तर दोषीला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड कदाचित दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११(१) (एल) नुसार, एखाद्या व्यक्तीने एखाद्या प्राण्याचे हात पाय कापले किंवा कोणतेही कारण नसताना क्रूर पद्धतीने मारले, तर दोषीला तीन महिन्‍यांचा तुरुंगवास किंवा तुरुंगवास होऊ शकतो वेळ पडल्यास दोन्हीही शिक्षा करण्यात येते.