Viral Video: अनेकांना सर्व काही आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा फार मोह असतो. एखाद्या वेळेस अशा माणसाच्या जवळच्या व्यक्ती प्रेमापोटी त्याचं ऐकतीलही पण प्राणी असे हट्ट अजिबात जुमानत नाहीत. आजवर तुम्ही लोकांना प्राणी पाळताना पाहिले असेल. शाळेपासून आपल्याला शिकवलं आहे की पाळीव प्राणी म्हणजे कोण तर, कुत्रा, मांजर, गाय फार फार तर हत्ती- घोडे- उंट. वाघ- सिंह ही राजे मंडळी मात्र जंगली प्राण्यांच्या गटात येतात. निसर्गाने या प्राण्यांचा स्वभाव आक्रमकच तयार केला आहे त्यामुळे सहसा हे दोन प्राणी पाळले जात नाहीत. पण माणसाला जे शक्य नाही तेच करण्याची इच्छा असते आणि हीच इच्छा कधीतरी चांगलीच अंगाशी येते. अलीकडे सिंहिणीसह पिंजऱ्यात शिरलेल्या माणसचीही अशीच काही अवस्था झाली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एक माणूस दोन सिंहिणींच्यामध्ये पिंजऱ्यात अडकला आहे. इथे आणखी दोन जण बाजूला आहेत पण सिंहीणी पहिल्या शिरलेल्या एकाच माणसाला लक्ष्य करून उभ्या ठाकल्या आहेत. दोघी सिंहीणी त्या माणसावर झडप घालायला जाणार इतक्यात सुदैवाने या माणसाचा एक मित्र तिथे येतो आणि मग जे घडतं ते तुम्ही स्वतः पाहा.
अन् तीन सिंहिणीच्या जाळ्यात अडकला ‘तो’
हे ही वाचा<< ‘हा’ आहे जगातील दुसरा सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी; तुम्हाला नाव व खासियत माहितेय का?
मलिक हुमाइसने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी टीका केली आहे. जरी तो माणूस सुरक्षितपणे बचावला असला तरी, हे असे खेळ करणेच चुकीचे आहे असेही अनेकांनी लिहिले आहे.या व्हायरल व्हिडिओला ७ लाखाहून जास्त व्ह्यूज आणि ९ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय सिंहाच्या पिंजऱ्यात शिरलेल्या या माणसाची नेटकऱ्यांनी चांगलीच शाळा घेतली आहे.