Man attacked Lady Constable: अनेक वर्षांपासून वाढत चाललेल्या अत्याचारांमुळे आजही महिला कुठेच सुरक्षित नाहीत, असे वाटू लागलेय. रात्री एकट्या असणाऱ्या महिलेची छेड काढणे, तिच्याबरोबर वाईट वर्तणूक करणे, तिचा पाठलाग करणे अशा आणि यापेक्षा अनेक वाईट घटना आपण ऐकल्या असतील. पण, अशात आता या विकृत माणसांची इतकी हिंमत वाढू लागली आहे की दिवसाढवळ्या ही लोक महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करायलाही मागे पुढे पाहत नाहीत.

सध्या असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये घडला आहे. या ठिकाणी रस्त्यावरून चालत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलवर काही लोकांनी भरदिवसा हल्ला केला. या घटनेने लोकांना धक्का बसला असून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

महिला कॉन्स्टेबलच्या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार महिला कॉन्स्टेबलच्या जवळ येताना दिसत आहे. दुचाकीस्वार त्याचे वाहन महिला कॉन्स्टेबलच्या शेजारी थांबवतो आणि संभाषण सुरू करतो. थोड्या संभाषणानंतर तो तिच्याशी गैरवर्तन करताना दिसतोय. तसंच वाद झाल्यानंतर हा दुचाकीस्वार बाईकवरून उठून महिलेवर हल्ला करत तिला जमिनीवर आदळताना दिसतोय. हा दुचाकीस्वार सार्वजनिकरित्या तिच्यावर शारीरिक अत्याचार करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येतंय.

हेही वाचा… चालकाचा एक निर्णय आणि मृत्यू टळला! स्कूटरमधून निघाला धूर अन्…, पुढच्याच क्षणी जे घडलं ते पाहून बसेल धक्का, पाहा VIDEO

FPJच्या वृत्तानुसार या दुचाकीस्वाराने अमरीन नावाच्या महिला कॉन्स्टेबलच्या कानाखाली मारलं आणि तिला जमिनीवर आदळलं. जमिनीवर आदळल्यानंतर दुचाकीस्वार तिला अयोग्यरित्या स्पर्श करताना दिसला. काही वेळानंतर तिथे गर्दी जमा झाली आणि त्या दुचाकीस्वाराला लोकांनी महिला कॉन्स्टेबलपासून दूर केलं. या सगळ्यात त्याचे आणखी साथीदार सामील असल्याचंही कळून येतं. कारण जेव्हा महिला कॉन्स्टेबल त्या दुचाकीस्वाराच्या बाईकच्या नंबरचा फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसली तेव्हा काहीजणांनी तिला अडवलं. यामुळे तिचं पुन्हा एकदा त्याच्या साथीदारांशी भांडण झालं आणि हाणामाराही झाली.

हा व्हिडीओ @ImranTG1 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “यूपीच्या मुरादाबादमध्ये एका महिला कॉन्स्टेबलची एकच चूक होती की तिने बाईक चालवणाऱ्या तरुणाची बाइक सुरू करण्यास नकार दिला. यानंतर तरुणाने महिलेची छेड काढत तिला मारहाण केली” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… VIDEO: मुंबई एसी लोकलमध्ये दोन महिला भिडल्या, लाथा-बुक्क्यांनी मारलं अन् केली शिवीगाळ, पाहा नेमकं काय घडलं

या प्रकरणी नोंदवलेल्या एका गुन्ह्यात अमरीनने नमूद केले आहे की, तिच्या खाजगी (नॉन-ड्युटीच्या) वेळेत काही पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केला आणि हल्ला केला. या प्रकरणाची दखल घेत मुरादाबाद पोलिसांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला ज्यामध्ये महिला कॉन्स्टेबलचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे असं सांगितलं.

“पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन्सच्या हद्दीत एका महिला कॉन्स्टेबलसोबत काही लोकांकडून शिवीगाळ, मारहाण, असभ्य वर्तन इत्यादी संदर्भात, सिव्हिल लाइन्स मुरादाबाद पोलिस स्टेशन येथे संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, इतर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे”, असं मुरादाबाद पोलिसांनी सांगितले.

Story img Loader