तुम्ही कधी असा व्हिडिओ पाहिला आहे का ज्यात लोक अंत्यत कुशलतेने करामती सादर करतात आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात? इंस्टाग्रामवर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती पायऱ्या चढत असताना दिसत आहे पण त्याच्या डोक्यावर काठोकाठ भरलेले दहा ग्लास ठेवलेले आहे. या व्हिडीओमधील या व्यक्तीचे कौशल्या आणि बॅलन्स पाहून लोक थक्क होत आहे.

हा व्हिडिओ मूळतः टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला होता. नंतर ते इन्स्टाग्रामवर “असे करण्याचा ही एक पद्धत आहे!” या कॅप्शनसह शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस त्याच्या डोक्यावर एकावर एक अशा १० ग्लासचा पिरॅमिड ठेवला आहे. तो माणूस काळजीपूर्वक पायऱ्या चढताना त्याच्या परफेक्ट बॅलन्स राखताना दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक शांत भाव आहे, जणू काही त्याच्यासाठी हे यश काही मोठी गोष्ट नाही.

हेही वाचा – दोन तास घ्या पण ‘या’ फोटोतील दुसरा Giraffe शोधून दाखवा! ९८ टक्के लोक ठरले अपयशी

या व्हिडीओने तुम्हालाही थक्क केले आहे का? कारण असे वाटणारे तुम्ही एकटे नाही. बहुतेक लोकांनी व्हिडिओबद्दल अशाच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बर्‍याच लोकांनी सांगितले की, त्या माणसाकडे “खरे टॅलेंट” आहे. एका युजरने सांगितले की, “मी हे असे माझ्या हातात पकडू शकत नाही.” दुसर्‍याने लिहिले, “व्वा, मी नुकतीच रियल टॅलेंट पाहिले !!!”

हेही वाचा – ”फक्त मराठी महिलाच कामवाली बाई दाखवायची का ?” मुंबईतील ‘या’ जाहिरातीवर नेटकऱ्यांनी घेतला आक्षेप

हा व्हिडिओ 2 जून रोजी पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर व्हायरल झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत तो दहा कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ही संख्या अजूनही वाढत आहे. या व्हिडिओबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंट करून कळवा.

Story img Loader