सापाचे नाव ऐकले तरी अनेकांना भीती वाटते, शिवाय रस्त्यावरून येजा करताना अचानक साप दिसला तरी आपल्या अंगावर शहारे येतात. विषारी सापाच्या दंशाने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे सापापासून सर्वच लोक दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या असा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण भल्यामोठ्या किंग कोब्राला लहान मुलाप्रमाणे अंघोळ घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सापाला अंघोळ घालणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ वन अधिकारी सुशांत नंदा यांनी एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक हा तरुण धोकादायक किंग कोब्राला अगदी सहज पद्धतीने आणि न घाबरता अंघोळ घालताना दिसत आहे. शिवाय सापदेखील आंघोळीचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बादलीतून पाणी घेतो आणि मग तो कोब्राच्या तोंडावर पाणी ओततो. तो असे एक-दोनदा नव्हे तर अनेकदा करतो आणि सापाचे शरीर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो.

हेही पाहा- ट्रकचा धक्का लागला अन् बाईकस्वार थेट… अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स!

सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “किंग कोब्राला अंघोळ घालताना! सापांची त्वचा त्यांना घाणीपासून वाचवते. ते वेळोवेळी ती त्वचाही काढून टाकतात, मग आगीशी खेळायची गरज काय?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यामुळे या व्हिडीओतून त्यांना असे जीवघेणे स्टंट करु नका असंच लोकांना सांगायचं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे, “भाऊ, साप चावला तर पाणीही मागता यायचं नाही.” तर आणखी एका यूजरने लिहिलं,” साप खूप धोकादायक असतात, अशी कृत्य करु नका.”