साप नुसता पाहिला तरी सर्वांच्याच मनात भिती निर्माण होते. त्यात त्याने जण फणा काढला तर अंगावर काटा उभा राहतो आणि तो आपल्याला चावेली की काय, अशी धडकी भरते. पण एका माणसाने सापासोबत असं काही केलं की बघून सारेच जण हैराण झाले आहेत. लहान बाळाला जशी आपण अंघोळ घालतो, अगदी त्याप्रमाणे या माणसाने सापाला अंघोळ घातली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
प्राणी आणि माणसांना एकमेकांची भाषा कळत नसेल तरी, त्यांच्यातील प्रेमाचं नात अनेक गोष्टी न बोलताही सांगून जातं. अशी अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आली आहेत. ज्यामध्ये माणूस आणि प्राणी मग ते सारेच पक्षी, मासे, कुत्रा, मांजर असे सारेच पाहिले असतील. पण सापासोबतची मैत्री तुम्ही आतापर्यंत फक्त चित्रपटात पाहिली असेल. पण प्रत्यक्षात सापासोबतच्या मैत्री पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक माणूस भल्यामोठ्या कोब्रा सापाला स्वतःच्या हाताने अंघोळ घालताना दिसून येतोय. यावेळी कोब्रा साप सुद्धा एखाद्या लहान बाळाप्रमाणे अंघोळीचा आनंद घेताना दिसून येतोय. या लांबलचक कोब्रा सापाला पाहून कोणालाही घाम फुटेल, पण व्हिडीओमधला माणूस मात्र अगदी सहजपणे त्याला अंघोळ घालतोय. इतकंच नव्हे तर तो कोब्राला पिण्यासाठी पाणी देखील देताना दिसून येतोय.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल, की या दोघींमध्ये अतिशय प्रेमाचं असं नातं आहे. या दोघांना पाहिल्यानंतर असं वाटतं की, दोघांमध्ये चांगलीच मैत्री आहे. पण ज्या प्रकारे कोब्रा फणा काढतो ते पाहून असं वाटतं की पुढे काहीतरी खतरनाक होऊ शकतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. साप आणि माणसाचं हे नातं पाहूनच या व्हिडीओला नेटकरी अतिशय प्रेम देत असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३३ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.