आयुष्य हे लाखमोलाचं असतं, असं म्हणतात. पण काही जणांसाठी ते केवळ टाईमपास असतं. आयुष्यात कोणती स्वप्न उराशी बाळगायची आणि आपलं ध्येय काय असावं, याबाबत अनेकांचा गोंधळच उडालेला असतो. कारण अशी माणसं लोकांचं मनोरंजन करण्यासाठी कधी काय करतील याचा नेम राहिला नाही. विषारी सापांच्या दुनियेत गेलात तर जीवाला मुकल्याशिवाय राहणार नाहीत, हे माहित असूनही काही जण सापांसोबत लहान मुलासारखं खेळत असतात. एका तरुणाने जगातील सर्वात जास्त विषारी समजल्या जाणाऱ्या किंग कोब्राची शॅम्पूने आंघोळच केली. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
इथे पाहा किंग कोब्राचा थरारक व्हिडीओ
अंगावर शहारे आणणारा हा थरारक व्हिडीओ @DPrasanthNair नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. युजरने कॅप्शनमध्ये म्हटलं, साप आणि माणसामध्ये असलेली बॉन्डिंग पाहा, एक तरुण या सापाची लहान मुलासारखी आंघोळ करताना दिसत आहे. ४५ सेकंदाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंच्या संख्येत व्यूज आले आहेत. या व्हिडीओ ज्यांनी कुणी पाहिला असेल, त्यांना धक्का बसल्याशिवाय राहिला नसेल.
किंग कोब्राच्या या थरारक व्हिडीओला एका युजरने कमेंट करत म्हटलं, हा व्हिडीओ थायलॅंडचा असू शकतो, असं मला वाटतं. पण हे साप खतरनाक आणि विषारी असतात. एकदा अशा सापांनी तुम्हाला दंश केला, तर मृत्यूनं तुम्हाला गाठलंच…दुसऱ्या एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं, अरे वाह, किती बहादूर आहे…व्हिडीओ पाहून माझ्या नाकी नऊ आले. तसंच अन्य एका युजरने लिहिलं, हे मी काय पाहतोय भय्या…